फ्रीज, पंखा, गॅस बर्नर नादुरूस्त झालाय ? घर बसल्या ‘अशी’ करा होम अप्लायन्सची दुरूस्ती !

पुणे, पोलिसनामा ऑनलाईन- लॉकडाऊन मध्ये अनेकांची घरात लागणारी काही उपकरणे खराब झाली आहे. तसेच सर्व दुकाने बंद असल्यामुळे त्याची दुरुस्ती देखील करता येत नाही. लोकांची हीच अडचण ओळखून २४X ७ अराउंड या कंपनीने राष्ट्रीय व्हिडीओ हेल्पलाईन सुरु केली आहे. याद्वारे कंपनीतील कर्मचारी , इंजिनियर हे घरूनच ग्राहकांना व्हाट्सअप आणि गूगल मीट व्हिडिओद्वारे मदत करणार आहेत. बिघडलेल्या उपकरणाच्या दुरुस्ती साठी ते मार्गदर्शन करतील. ही सुविधा विनामूल्य असून ग्राहकांना ९५५५०००२४७ या क्रमांकावर संपर्क साधून या सुविधेचा लाभ घेता येईल.

या तंत्रज्ञांच्या साहाय्याने ग्राहकांना रेफ्रिजरेटर, वॉटर प्युरिफायर्स, एसी, वॉशिंग मशीन, गॅस बर्नर इत्यादी उपकरणे दुरुस्त करण्याकरिता ऑनलाईन मार्गदर्शन केले जाईल. या सुविधेमागील उद्देश स्पष्ट करताना २४x७ अराउंडचे सीईओ आणि सहसंस्थापक श्री नितीन मल्होत्रा म्हणाले, ‘या क्षेत्राला दर ३० दिवसात २५ दशलक्ष इलेक्ट्रॉनिक उत्पादने दुरूस्त करण्याची मागणी असते. त्यामुळे सध्या अनेक लोक त्रस्त आहेत. यापैकी गॅस बर्नर, वॉटर प्युरिफायर, एसी, वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर ही लोकप्रिय उपकरणे आम्ही ऑनलाइन दुरूस्त करत आहोत. व्हिडिओद्वारे दुरुस्तीचे प्रमाण सध्या २५ ते ३० टक्के आहे. आम्ही काही प्रमाणात ग्राहकांची अडचण दूर करण्यात सक्षम ठरत आहोत याचे आम्हाला समाधान आहे.’

अशाप्रकारे लॉकडाऊनच्या काळात आपण इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्त करू शकतो. चला तर मग या हेल्पलाइनचा मोबाईल नंबर स्वतःजवळ सेव्ह करून ठेवा ९५५५०००२४७