नारायण राणेंचा CM ठाकरेंना थेट सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री, हीच का उपकाराची परतफेड?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोकणातील कोरोना (Corona ) परिस्थितीवरुन भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Former Chief Minister Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Chief Minister Uddhav Thackeray) पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. कोरोना काळात (Corona) वैद्यकीय सुविधा (Medical facility ) उपलब्ध करुन देण्यात सिंधुदुर्गावर (Sindhudarga) अन्याय झाल्याचा आरोप राणेंनी केला. कोरोना काळात सिंधुदुर्गात 901 तर रत्नागिरीमध्ये ( Ratnagiri) 1561 मृत्यु (Death) झाले आहेत. याला पुर्णपणे मुख्यमंत्री ठाकरे (Former Chief Minister Narayan Rane) जबाबदार आहेत. शिवसेनेला (Shiv Sena) स्थापनेपासून साथ देणाऱ्या सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या पदरी मृत्यू, मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड ? असा सवाल राणेंनी केला आहे. (repayment favors narayan ranes direct question chief minister uddhav thackeray)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

कोलगाव ग्रामपंचायततर्फे तयार केलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय विलगीकरण कक्षाचे उद्घाटन नारायण राणे ( Narayan Rane) यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केले.
सिंंधुदर्ग आणि रत्नागिरी (Sindhudarga and Ratnagiri) जिल्ह्यात हॉस्पिटल आहेत; पण डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, ऑक्सिजन अन् औषधांचा पुरवठा नाही.
दातांचे व त्वचेचे डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. याची राज्य शासनाला लाज कशी वाटत नाही, असा सवाल राणे यांनी केला आहे.

सिंधुदुर्गची आरोग्यव्यवस्था बिकट
नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, जिल्ह्याची आरोग्यव्यवस्था अत्यंत बिकट आहे. अनेक रुग्णांचे बळी जात आहेत, तर काहीजण अत्यवस्थ आहेत.
याबाबत आपल राज्याच्या आरोग्य सचिवांशी सकाळीच बोलणे झाले आहे.
त्यावेळी त्यांच्याशी मी विस्तृत चर्चा करून जिल्ह्यातील रुग्णालयांना फिजिशियन, डॉक्टर, नर्स व इतर आरोग्य कर्मचारी पुरविण्यासंदर्भात सूचना केल्या.
त्यानुसार त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्वरित देण्याचे आश्वासन दिले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : repayment favors narayan ranes direct question chief minister uddhav thackeray

 

हे देखील वाचा

18 जून राशीफळ : ‘या’ 5 राशीवाल्यांना होणार धनलाभ, नोकरी-व्यापारात प्रगतीचे संकेत, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

Coronavirus | गृह मंत्रालयाने केले राज्यांना अलर्ट ! दुसर्‍या लाटेपेक्षा सुद्धा भयंकर असू शकते तिसरी लाट