दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयासमोर ‘राफेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांत एकमेकांवर मोठ्या प्रमाणात चिखलफेक झाली. सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर जोरदार टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. परंतु या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चिला गेला तो राफेलचा मुद्दा.

विरोधी पक्षांनी त्यातली त्यात राहुल गांधींनी या मुद्यावर साताधार्यांना चांगलेच धाऱ्यावर धरले होते. त्यामुळे राफेल विमान चांगलेच चर्चेत आले होते आणि सर्वांना परिचितही झाले होते. यातच आता दिल्लीतील काँग्रेस मुख्यलयासमोर राफेल विमानाची प्रतिकृती लावण्यात आली आहे.

दिल्लीमधील २४ अकबर रोडवर काँग्रेस पक्षाचे मुख्यालय आहे. मुख्यालयाच्या बाजूलाच वायुसेना प्रमुख बी.एस. धनोआ यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थाना समोरच राफेल विमानाची प्रतिकृती लावली आहे. त्याच्या बाजूलाच काँग्रेस मुख्यालय असल्यामुळे ही प्रतिकृती काँग्रेस मुख्यालयासमोर लावली असा भास होतो आहे. राफेलची लावलेली प्रतिकृती दिल्लीकरांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली असून एएनआयने देखील याचा फोटो शेअर केला आहे.

धनोआ यांनी काही दिवसांपूर्वीच राफेल विमानांचे कौतुक केले होते. तसेच राफेलची उत्सकता लागल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यातच आता राफेल विमानाची प्रतिकृतीच धनोआ यांच्या निवासस्थानासमोर लावण्यात आली आहे. राफेल विमान यावर्षी सप्टेंबरमध्ये भारतात दाखल होणार आहे.