अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड ‘प्रेग्नेंट’ ; अर्जुनच्या मुलीनं दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बी टाऊनमध्ये सध्या चर्चेचा विषय आहे तो अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची प्रेयसी गॅबिला डेमेट्रिएड्स यांच्या नात्याची. तसंच त्यांच्या होणाऱ्या बाळाची. अर्जुनने काही दिवसांपूर्वी त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या या नव्या पाहुण्याविषयी माहिती दिली. अर्जुन हा विवाहीत आहे. त्याचा घटस्फोटही झाला नाही. त्यात त्याला दोन मुली आहेत. तरीही त्याने खुलेआमपणे आपल्या या नात्याबद्दल सर्वांना माहिती दिली. अर्जुनच्या पत्नीने त्याच्या प्रियसीचा स्वीकारही केला. तसंच गर्लफेंडच्या गरोदरपणावर त्याच्या मुलींनी काय प्रतिक्रिया दिली, हे त्यानेच सांगितलं आहे.

अर्जुनला मेहेर जेसिया हिच्यासोबतच्या लग्नातून माहिका (१७) आणि मायरा (१३) अशा दोन मुली आहेत. त्यामुळे अर्जुनच्या या नात्यावर मुलींचीही प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. एका वृत्तपत्राला सांगताना त्याने याबद्दल खुलासा केला. आम्ही काही मित्रांमुळे भेटलो होतो. तिच्याविषयी काय सांगू, की ती मला न्याहाळत होती ? आम्ही एकत्र येऊन फक्त एकच वर्ष झालं आहे आणि आज आम्ही इथवर पोहोचलो आहोत’, असं अर्जुन म्हणाला. या साऱ्यामध्ये आपल्या मुलींनी गॅब्रिलाचा स्वीकार करणंही तितकच महत्त्वाचं असल्याची बाब त्याने समोर ठेवली. ती सुद्धा कुटुंबाचाच एक भाग असल्याचं त्यांनी स्वीकारणं महत्त्वाचं होतं आणि कोणत्याही प्रतिप्रश्नाशिवाय त्यांनी ही गोष्ट स्वीकारल्यामुळे आपण स्वत:ला नशिबवान समजतो, असं त्याने यावेळी म्हटलं.

दरम्यान, गॅब्रिला ही दक्षिण आफ्रिकन मॉडेल आहे. ती आणि अर्जुन त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये त्यांच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार आहे.