खुशखबर ! बँकेचे व्याजदर आणखी कमी होणार, ‘या’ महिन्यापर्यंत पहा वाट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआय चालू वित्तीय वर्षाच्या समाप्ती आधी आपल्या मुख्य व्याजदरात अतिरिक्त ०.४० टक्के कपात करण्याची शक्यता आहे. आरबीआयने आता केलेल्या रेपो दरातील कपातीमुळे आर्थिक विकास दर वाढण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे आता अतिरिक्त रेपो दर कमी करण्यात येण्याची शक्यता आहे.

आरबीआयने ७ ऑगस्टला रेपो आणि रिवर्स रेपो दरात ०.३५ टक्के कपात केली होती. व्याजदरात कपात केल्याने बँकांनी हवा तसा फायदा ग्राहकांना मिळवून दिला नाही. यामुळे आरबीआय आपल्या व्याजदरात अधिक कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरबीआयने या वर्षात चार वेळी व्याजदरात कपात केली आहे, परंतू बँकांनी कर्जाच्या दरात आवश्यक तेवढी कपात केली नाही. या वर्षात आरबीआयने व्याजदरात एकूण १.१० टक्के कपात केली आहे. परंतू असे करुन देखील आर्थिक परिस्थितीत अपेक्षित वाढ झाली नाही. विकासदर ५ वर्षात अत्यंत खालच्या स्तरावर गेला आहे. थेट परकीय गंतुणूकीत देखील स्थुलता आली आहे. वाहन क्षेत्रात देखील गंभीर परिस्थिती आहे. अनेक लोकांचा यात रोजगार बुडाला आहे.

विकास दरात ६.८ टक्के राहण्याची शक्यता –

वित्त वर्षात देशाचा विकासदर ६.८ टक्के राहण्याची शक्यता आहे. हा दर आरबीआयच्या अनुमानापेक्षा कमी आहे. आरबीआयने विकासदराचे अनुमान ६.९ टक्के गृहित धरला होता. फिच नुसार महागाईचा दर ३.८ टक्के राहू शकतो. हे आरबीआयच्या ४ टक्के लक्षापेक्षा कमी आहे. यामुळे आरबीआय आता विकासदरात वाढ करण्यावर लक्ष केंद्रीत करु शकते. याचमुळे व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like