खुशखबर ! लवकरच कर्जे ‘स्वस्त’ होणार, RBIकडून होऊ शकते ‘रेपो’ दरात कपात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयने चौथ्यांदा रेपो दरात कपात करुन हे संकेत दिले आहेत की, आता बँकांची प्राथमिकता आर्थिक विकास वाढवण्यावर आहे. यामुळे बँकांनी रेपो रेट मध्ये ०.२५ बेसिस प्वाइंट नाही तर ०.३५ बेसिस प्वाइंटने कपात केली आहे. केंद्रीय बँक येणाऱ्या दिवसात रेपो रेटमध्ये आधिक कपात करण्याची शक्यता आहे. चार वेळा आरबीआयने रेपो रेट मध्ये एकूण १.१० टक्के कपात केली आहे.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी विश्वास दर्शवला की, अर्थव्यवस्था लवकरच चांगल्या वेगाने वाढेल. त्यांनी सांगितले की अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी आरबीआय महत्वपूर्ण पावले उचलत आहे. यात रेपो रेट कमी करणे, रिस्क वेटेज कमी करणे आणि ग्राहकांना दिलासा देण्यासारखे पावले उचलली जाणार आहे. आरबीआयने याच्यासाठी तयारी केली आहे. एनबीएफसीला जास्त लोन मिळेल आणि छोट्या उद्योगांना प्राथमिकता मिळेल याचा विचार करण्यात येत आहे.

स्वत कर्जाने अर्थव्यवस्थेला मिळणार वेग

शक्तिकांत दास यांच्या मते, कर्ज स्वस्त झाल्याने अर्थव्यवस्थेचा वेग वाढेल. अशाने अर्थव्यवस्था वेग देखील पकडेल. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर देखील लोकांना याचा फायदा मिळू शकत नाही. कारण बँक आपल्या इंटरेस्ट रेटमध्ये कपात करत आहे. त्यांनी हा विश्वास देखील दर्शवला की बँक आता असे करु शकणार नाहीत आणि रेपो रेटच्या कपातीचा फायदा ग्राहकांना मिळेल.

शक्तिकांत दास यांच्या विधानानंतर रेपो रेट मध्ये आणखी कपात होण्याची शक्यता आहे, यामुळे लोकांना आधिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे कर्ज देखील स्वस्त होईल.

आरोग्यविषयक वृत्त