पतंगाचा दोर लागून पत्रकार गंभीर जखमी

भोकर : (माधव मेकेवाड) पोलीसनामा ऑनलाइन –  वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारास अचानक उडत आलेल्या पतंगाचा दोर चेहर्‍यावर आल्याने हनूवटीस गंभीर दूखापत झाली असुन ते बालंबाल बचावले घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की,दै दलितवाणीचे प्रतिनिधी अनिल डोईफोडे हे सोमवार दिनांक ०८ जून रोजी कृषी कार्यालय भोकर येथे वृत्त संकलनासाठी जाऊन आपल्या दुचाकीवरून परत येत असताना गांधी चौकात अचानक एक पतंग त्यांच्या समोरून उडत आली, त्या पतंगाचा दोर पत्रकार डोईफोडे यांच्या चेहऱ्यास अडकला गेल्याने गाल व हनुवटीस जबर दूखापत झाली दैव बलवत्तर या घटनेत बालंबाल बचावले त्यांना तात्काळ काही नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दाखल केले असता तेथील डाॅक्टरांनी त्यांच्यावर उपचार करुन हनूवटीवर आणि गालावर टाके मारण्यात आले.

पतंगासाठी वापरण्यात येत असलेला दोर (मांजा) विक्रीवर बंदी असून तरीही शहरात हा जिवघेणा दोर विक्रि होतो अशा दूकानचालकार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.