पत्रकार मंगेश कोळपकर यांना मातृशोक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महात्मा फुले मंडईतील बांगड्यांच्या व्यापारी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ. सुनीता मधुकर कोळपकर (वय 76, रा. बिबवेवाडी) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या मागे पती, 2 मुलगे, मुलगी असा परिवार आहे. सकाळचे पत्रकार मंगेश कोळपकर हे त्यांचे पुत्र होत. सुनीता कोळपकर यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री 8.30 वाजता वैकुंठ स्मशाभूमीत (नवी पेठ) अंत्यसंस्कार होतील.