PoK मध्ये एयरस्ट्राइकची अफवा, लष्करानं सांगितलं – ‘एकसुद्धा गोळी सुटली नाही, वृत्त खोटे’

नवी दिल्ली : भारताने दहशतवादी लाँच पॅडवर एयरस्ट्राइक केल्याच्या बातम्यांना भारतीय लष्कराने बनावट म्हटले आहे. भारतीय लष्कराचे महासंचालक सैन्य अभियान लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह यांनी म्हटले की, पीओकेमध्ये एक सुद्धा गोळी चालवण्यात आलेली नाही. अशाप्रकारच्या बातम्या खोट्या आहेत. यापूर्वी अनेक मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले जात होते की, पीओकेमध्ये दहशतवादी लाँच पॅडवर भारताने एयरस्ट्राइक केला आहे.

जम्मूच्या नागरोटामध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर गुरूवारी आयजी विजय कुमार यांनी म्हटले की, पाकिस्तान आगामी डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल म्हणजे डीडीसीच्या निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे. कुमार यांनी म्हटले की, मागील काही दिवसांपासून पाकिस्तान यासाठी सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, याची अद्याप माहिती नाही की, या स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मारले गेले आहेत. पाकिस्तानी लष्कर मागील अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशवाद्यांच्या घुसखोरीचे समर्थन करण्यासाठी गोळीबाराचा आधार घेत एलओसीच्या भारतीय भागावर नागरिकांना निशाणा बनवत आहे.

नगरोटा एन्काऊंटरमध्ये 4 दहशतवादी ठार, 11 एके 47 रायफल जप्त
जम्मू-काश्मीरच्या नगरोटा परिसरात गुरूवारी सकाळी सुरक्षा दलांनी ट्रकमध्ये लपून जात असलेल्या चार दहशतवाद्यांना ठार केले. हे सर्व दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित होते. चकमक सकाळी 5 वाजता सुरू झाली, ज्यानंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला होता.

भारतीय लष्कराच्या मजबूत अँटी इनफिल्ट्रेशन ग्रिडमुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यात यश मिळत नसल्याचे दिसत आहे. खोर्‍यात हत्यारे पोहचवणे सुद्धा त्यांना अशक्य झाले आहे. आयएसआयने अगोदरच दहशतवादी गटांना हा अल्टीमेटम दिला आहे की, बर्फवृष्टी होण्यापूर्वी दहशतवाद्यांची घुसखोरी, हत्यारांसह झाली पाहिजे. कारण बर्फवृष्टीनंतर घुसखोरी करणे अशक्य होणार आहे.