जेजुरी : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बेलसर मध्ये विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – बेलसर गावचे सुपुत्र व शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य कै. विलास (मामा) नारायण जगताप यांच्या स्मरणार्थ ‘बालसिद्धनाथ प्रतिष्ठान हडपसर/बेलसर’ यांच्यावतीने बेलसर मधील बालसिद्धनाथ विद्यालय, बेलसरच्या सर्व विद्यार्थ्यांना आंब्याची वृक्ष वाटण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत बेलसर हिरवेगार करण्याच्या उद्देशाने आणि मामाची आठवण प्रत्येक वृक्ष रुपाने समाजामध्ये रहावी अशा उत्कृष्ट हेतूने आणि समाजासाठी असलेल्या बांधिलकीच्या नात्याने बेलसर मध्ये आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त केशर आंबा व नारळ व आधी उपयुक्त वृक्षांचे वाटप करण्यात आले.

त्याचप्रमाणे पुढील वर्षी म्हणजेच 26जानेवारी 2021 रोजी वाटलेल्या सर्व झाडांची पाहणी करून विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कैलास जगताप यांनी प्रास्ताविका वेळी दिली. त्याचप्रमाणे मामाच्या आठवणी जाग्या करत बेलसर मधील ग्रामस्थांनी वृक्ष वाटून मामांना आदरांजली वाहिली.

यावेळी बेलसर गावच्या सरपंच स्वातीताई गरुड, उपसरपंच पांडुरंग जगताप, मा.उपसरपंच संतोष जगताप, गणेश जगताप, विशाल हिंगणे, मा. सरपंच वनिता जगताप, सुजाता हिंगणे, पुनम जगताप, सोनाली रासकर, मा सरपंच हनुमंत जगताप, निलेश जगताप, विलास भाऊ जगताप, मामा गरुड, हेमंत जगताप, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष माऊली दादा जगताप, रणधीर बापू जगताप, शिवसेना नेते धीरज जगताप तसेच तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश बुधे, बाल सिद्धनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक सह संपूर्ण कर्मचारी वर्ग व बेलसर गावातील युवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

फेसबुक पेज लाईक करा –