लासलगावमध्ये 71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित तिन्ही विद्याशाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिन विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. लेझीम, झांजर आणि ढोल पथकाने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची मने जिंकली. लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब गोसावी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत संस्थेच्या शैक्षणिक विकासाचा चढता आलेख सादर केला. राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित शिक्षक सखाहरी आव्हाड यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

शाळेच्या प्रांगणात एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी वाघा बॉर्डर वरील संचलनाच्या दृश्यांची प्रत्यक्ष झलक उपस्थितांना दाखविली. कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चित्ररथाद्वारे महापुरुषांच्या अन् समाजसुधारकांच्या अथक परिश्रमाने निर्मिलेल्या भारतीय संस्कृतीच्या विविधतेतील एकतेचे दर्शन घडविले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासह रोप मल्लखांबाचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले.

lasalgaon

कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वकृत्व, कला, क्रीडा आणि शैक्षणिक उपक्रमात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. विज्ञान छंद मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना मिळावी यासाठी वैज्ञानिक चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. जिजामाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी टाकाऊ पासून टिकाऊ अलंकाराचे विविध नमुने सादर करून सांस्कृतिक वैभवाचे दर्शन हस्तकला प्रदर्शनाद्वारे दाखविण्यात आले. यावेळी आव्हाड गुरुजी यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगून कै. दत्ताजी पाटील यांच्या अलौकिक कार्याचा परिचय करून दिला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लासलगाव प्रेस क्लबचे हारुन शेख, अरुण खांगळ, शेखर देसाई, निलेश देसाई, राकेश बोरा, आसिफ पठाण, उमेश पारीक, समीर पठाण, संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, पं. स सदस्या रंजनाताई पाटील , संचालिका निताताई पाटील, सिताराम जगताप, शंतनू पाटील,लक्ष्मण मापरी, कैलास ठोंबरे, पुष्पाताई दरेकर, डॉ. सुरेश दरेकर, डॉ. कैलास पाटील, प्रकाश गांगुर्डे, दादासाहेब कदम, विठ्ठल गायकर, मधुकर सरोदे, राजाभाऊ कराड, विजय कुंदे, स्वप्निल थोरे, राकेश शेजवळ, गोपाळ भावसार, अर्जुन माळी, डॉ.महाले, दादासाहेब कदम, सैनिक विजय श्रावण, मुख्याध्यापक अनिस काझी, पर्यवेक्षिका संजीवनी पाटील, रोशनी गायकवाड, सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत साबळे व कौतिक आवरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका सुद्धा आहेर यांनी मानले.

फेसबुक पेज लाईक करा –