पहिली चार वर्षे ‘या’ ठिकाणी साजरा करण्यात आला होता प्रजासत्ताक दिन, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – २६ जानेवारी हा दिवस संपूर्ण देशभर मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. दिल्लीच्या राजपथावर दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमत्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राजपथ म्हणजे रायसीना हिल ते राष्ट्रपती भवन हा मार्ग आहे. मात्र पहिली चार वर्ष प्रजासत्ताक दिन दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये साजरा केला जात असे.

कोठे कोठे साजरा झाला होता प्रजासत्ताक दिन
देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा तत्कालीन इर्विन स्टेडियम म्हणजेच सध्याच्या नॅशनल स्टेडियमवर साजरा झाला. दुसरा प्रजासत्ताक दिन (१९५२) किंग्जवे येथे तिसरा प्रजासत्ताक दिन (१९५३) लाल किल्ल्यावर तर त्यानंतरच्या प्रजासत्ताक दिन सोहळा (१९५४) रामलीला मैदानात पार पडला होता. त्यानंतर १९५५ पासून प्रजासत्ताक दिन राजपथावर साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. आज पर्यंत ही परंपरा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.

कसा साजरा होतो प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण होते.
यावेळी २१ तोफांची सलामी दिली जाते.
यावेळी तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित असतात.
तिन्ही दलाचे जवान संचलन करत राष्ट्रपतींना आणि तिरंग्याला सलामी देतात.
रायसीना हिल ते राष्ट्रपती भवन या राजपथावरून इंडिया गेट ते लाल किल्ला असे संचलन होते.
स्वातंत्र्य लढ्यासाठी शहीद झालेल्या जवानांचे स्मरण यावेळी केले जाते.
वीर सैनिकांना यावेळी अशोक चक्र आणि परमवीर चक्र देऊन सन्मानित केले जाते.
या दिवशी तीनही सैन्य दल आपले सामर्थ्य जगाला दाखवतात.

फेसबुक पेज लाईक करा –