जाणून घ्या : का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन ?

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – अनेकांना प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन यामधील संबंध समजायला खूप वेळ जातो. २६ जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे आणि तो का साजरा केला जातो हे देखील सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे. कारण यामागे खूप महत्वाची पार्श्वभूमी आहे आणि त्याचा संबंध थेट देशाशी निगडित आहे.

का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून मोठ्या उत्साहात दर वर्षी साजरा केला जातो. मात्र १९३० साली २६ जानेवारीला लाहोर येथे काँग्रेसचे जे अधिवेशन झाले, त्यातच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. याच अधिवेशनात तिरंगा ध्वजही फडकावण्यात आला. या दिवसाची आठवण म्हणून याच दिवशी राज्यघटना अंमलात आणण्याचे निश्चित करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला. राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस सुरू होते त्यानंतर २६ जानेवारी १९४९ रोजी देशाचे संविधान स्वीकृत करण्यात आले आणि याच दिवसापासून खऱ्या अर्थात देशात लोकशाहीला सुरुवात झाली. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्सहात साजरा केला जातो.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like