देशात एकाच ठिकाणी तयार होतो तिरंगा, फक्त ‘या’ एकाच कंपनीला आहे अधिकार

पोलीसनामा ऑनलाईन टीम : उद्या 72 वा प्रजासत्ताक दिन (दि. 26) असून त्यानिमित्त देशभरात जल्लोष बघायला मिळत आहे. देशाची राजधानी दिल्लीतील राजपथावर देशाची शान असलेल्या राष्ट्रध्वज तिरंगा फडकावण्यात येतो. तसेच यानिमित्ताने लाल किल्ला, राष्ट्रपती भवन, संसद, प्रत्येक सरकारी इमारत आणि भारतातील विदेशी दूतावास आणि उच्चआयोगात तिरंगा फडकवला जातो. तसेच अनेक शाळा आणि संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिनाला तिरंगा फडकावला जातो. तिरंग्याबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेम आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, आपला राष्ट्रीय ध्वज म्हणजे तिरंगा कुठे तयार केला जातो ? तो कोण तयार करते ? चला जाणून घेऊ या गोष्टी.

संपूर्ण भारतात फक्त एका ठिकाणी अधिकृतपणे तिरंग्याची निर्मिती केली जाते. म्हणजे सरकारी समारोह आणि मोठ्या कार्यक्रमांमध्ये फडकवला जाणारा राष्ट्रध्वज तयार करण्याचा कॉन्ट्रॅक्ट कर्नाटकातील खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाकडे (KKGSS) आहे. ही देशातील एकुलती ऑथराइज्ड राष्ट्रीय ध्वज तयार करणारी कंपनी आहे. ही कंपनी हुबलीच्या बेंगेरी परिसरात स्थित आहे आणि याला हुबली यूनिटही म्हटले जाते. कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाची स्थापना नोव्हेंबर 1957 मध्ये झाली होती. त्यांनी 1982 मध्ये खादी बनवणे सुरु केले आहे. आज देशात कुठेही अधिकृतपणे राष्ट्रध्वजाचा वापर केला जातो त्याचा पुरवठा याच कंपनीकडून केला जातो.

तिरंगा अनेक टप्प्यांनंतर तयार होतो. ज्यात धागा तयार करणे, कपडा तयार करणे, ब्लीचिंग व डाइंग चक्राची छपाई, तीन पट्ट्यांची शिलाई, इस्त्री करणे आणि टॉगलिंग यांचा समावेश आहे. राष्ट्रीय ध्वजाची क्वालिटी BIS चेक करतात. प्रत्येक सेक्शनमध्ये एकूण 18 वेळा तिरंग्याची क्वालिटी चेक केली जाते.

कोणकोणता तिरंगा अधिकृत
सरकारी मीटिंग्स आणि कॉन्फरन्स इत्यादी टेबलावर ठेवला जाणाऱ्या झेंड्याला अधिकारिक महत्व आहे. तसेच संवैधानिक पदांवर असलेल्या व्हीव्हीआयपींच्या वाहनावरील झेंडा अधिकारिक असतो. संसद आणि मंत्रालयांच्या रूम्समध्ये क्रॉस बारवर दिसणारे झंडे अधिकारिक असतात. सरकारी कार्यालये आणि छोट्या इमारतींवर लावल्या जाणाऱ्या झेंड्यांना अधिकारिक दर्जा प्राप्त आहे. इतकेच नाही तर शहीद सैनिकांच्या पार्थिवावर ठेवण्यासाठीही अधिकारिक ध्वजाचा वापर केला जातो. परेड करणाऱ्या सैनिकांच्या गन कॅरिएजवर लावलेला झेंडाही अधिकारिक असतो. लाल किल्ला, इंडिया गेट, राष्ट्रीय संग्रहालये, संसद भवन, राष्ट्रपती भवन यांवर लागणारे झेंडेही अधिकारिक आहेत.