Republic Day 2022 | धनकवडीच्या ऐश्वर्य कट्ट्याने पुढाकार घेत त्यांच्या जीवनात अनपेक्षित अशी आठवण पेरली ! स्वच्छतादूतांनी केले ध्वजारोहण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Republic Day 2022 | एरवीही पहाटे उठून आपल्या कामाला लागणारे हे स्वच्छता दूत… कोरोनाच्या काळात तुम्ही आम्ही घरी बसलो पण ते कर्तव्याला चुकले नाहीत. संसर्गाच्या संकटाला अंगावर झेलत ते स्वच्छतेचे आपले व्रत कायम निभावत आले. कोरोनाच्या काळातही न कुरकुरता प्रामाणिकपणे आणि निष्ठेने स्वच्छतेची त्यांची सेवा त्यांनी बजावली. (Republic Day 2022)

 

त्यांचे उतराई होण्यासाठी काल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने धनकवडीच्या ऐश्वर्य कट्ट्याने पुढाकार घेत या स्वच्छता दुतांच्या जीवनात अनपेक्षित अशी आठवण पेरली ती स्वच्छता दुतांच्या हस्तेच चिंतामणी ज्ञानपीठामध्ये झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम करून.

 

२६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनादिवशीची एक हृद्य आठवण या स्वच्छता दुतांना जपायला मिळण्यासारखे दुसरे सुख ते कोणते. आजवरच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतका मोठा मान मिळाल्याची भावनाही या स्वच्छता दुतांनी व्यक्त केली. (Republic Day 2022)

 

२६ जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचा असलेला दिवस. स्वातंत्र्याच्या अडीच वर्षानंतर राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक देश झाला.
मान्यवरांच्या हस्ते झेंडा फडकवण्याच्या परंपरेला फाटा देत वेगळी वाट चोखाळत ऐश्वर्य कट्ट्याने पुन्हा एकदा त्यांच्या सर्वसमावेशकेची झलकही दाखवली.
चाकोरीबाहेरच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात चिंतामणी ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष अप्पा रेणुसे यांनी विशेष पुढाकार घेतला होता.

 

या प्रसंगी अ‍ॅड. दिलीप जगताप, विलासदादा भणगे, रवींद्र संचेती, सचिन डिंबळे, युवराज रेणुसे, नेमीचंद सोळंकी, मधुकर कोंढरे, शिरीष चव्हाण, मनोज तोडकर, सायली गोवेकर, शर्मिला पांडे, अश्विनी देव आदी उपस्थित होते.

 

Web Title :- Republic Day 2022 | Dhankawadi’s Aishwarya Katta took the initiative and planted an unexpected memory in his life! Sanitation envoys hoisted the flag

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Home Remedies For Constipation | बद्धकोष्ठता पासून सुटका मिळवायची असेल तर खा ‘या’ 4 गोष्टी; जाणून घ्या

 

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 3494 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Online PPF Account | पीपीएफ अकाऊंट उघडू शकता ऑनलाइन, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया आणि योजनेचे फायदे