Republic Day | फसवणूक प्रकरणात पोलीस कारवाई करत नाहीत, प्रजासत्ताक दिनी माजी सैनिकाचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात प्रजासत्ताक दिन (Republic Day) उत्साहात सुरू आहे. तर दुसरीकडे राज्याचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयासमोर (Mumbai Mantralaya) एका माजी सैनिकाने (Former Soldier) आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. प्रजासत्ताक दिनी (Republic Day) घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आज सकाळी मंत्रालयासमोर सुरेश मुंडे (Suresh Munde) या तरुणाने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न (Attempted Self-Immolation) केला. मात्र वेळीच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी (Marine Drive Police) मुंडे यांना ताब्यात घेतले. सुरेश मंडे हे माजी सैनिक असून ते बीडचे (Beed) रहिवासी आहेत. बीड पोलीस हे फसवणूक (Fraud) प्रकरणात नेत्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करत नाही, त्यामुळे मुंडे यांनी मंत्रालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी मुंडे यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी करत आहेत.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) दिवशी सोलापूरमध्ये युवा भीम सेनेच्या (Yuva Bhim Sena)
पदाधिकाऱ्याने जिल्हा कृषी कार्यालयासमोर (District Agriculture Office Solapur) आत्मदहनाचा प्रयत्न
केला. जिल्ह्यातील बोगस खत कंपन्यांविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी युवा भीम सेनेकडून आंदोलन
करण्यात आले. कृषी अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी या पदाधिकाऱ्याने कृषी कार्यालयाच्या इमारती समोर
आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करुन पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतले.

तसेच, बारामतीत (Baramati) प्रजासत्ताक दिन उत्साहत साजरा होत असताना एका व्यक्तीने
आत्मदहनाचा प्रयत्न केला. दत्तात्रय शिवाजी भोसले असे या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात
घेतले आहे. गावातील प्रश्नांबाबत होत असलेल्या अन्यायाची प्रशासनाने दखल न घेतल्याने बारामती
तालुक्यातील निरावागज येथील भोसले यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Web Title :- Republic Day | a youth from beed attempted killed him self in front of the mantralaya on republic day mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | ‘राष्ट्रवादीची ‘ही’ खेळी सेनेवर दबाव टाकण्यासाठी होती का?’, शिंदे गटाच्या नेत्याचा परखड सवाल

Pune Crime News | बंगला विकत घेण्याच्या नावाखाली बनावट कागदपत्रे केली तयार; दुसर्‍याने बंगल्यावर घेतले सव्वा दोन कोटींचे कर्ज, ७५ वर्षाच्या ज्येष्ठाची फसवणूक

Jayant Patil | अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटील यांचे खळबळजनक विधान; म्हणाले…