दहीहंडी उत्सव समितीकडून एडग्रस्त मुलांसोबत प्रजासत्ताक दिन साजरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. पुण्यातील अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट तर्फे प्रजासत्ताक दिन एडसग्रस्त मुलांसोबत साजरा करण्यात आला.

ध्वजारोहणासाठी जात असलेल्या दोन एनसीसी(NCC) कॅडेट्सचा अपघाती मृत्यू 

पूना स्कूल फॉर ब्लाइंड गर्ल्स, कोथरूड येथे आणि ममता फाऊंडेशन कात्रज येथे एडसग्रस्त मुलांसोबत झेंडे, फुगे, खाऊ आणि नाश्ता वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. ट्रस्टच्या माध्यमातून मागील १४ वर्षापासून अशा प्रकरारचा उपक्रम दरवर्षी घेण्यात येतो. या कार्यक्रमाचे आयोजन गिरीश गुरनानी यांनी केले. यावेळी अमोल गायकवाड, संदेश कोतकर, विनायक वर्पे, गोविंद गुप्ता आणि इतर कार्यकर्ते उपस्थतीत होते.

अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून ट्रस्टला आणि ट्रस्टमध्ये काम करणाऱ्यांना वेगळाच आनंद आणि समाधान मिळते असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.