26 जानेवारीला राजपथवर खास चष्म्यात दिसणार CRPF जवान, ओसामाला मारण्याच्या मिशनमध्ये झाला होता वापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय राखीव पोलिस दल ( CRPF) यावर्षी प्रजासत्ताक दिनी आपल्या चौकीवर नाईट व्हिजन गॉगलचे प्रदर्शन करेल. हा तोच चष्मा आहे, जो घालून अमेरिकेच्या सील कमांडोजने जागतिक दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार मारले होते. एएनआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, असे पहिल्यांदा होईल, जेव्हा सीआरपीएफ आपल्या चौकीसह कोणते लढाऊ गॅझेट प्रदर्शित करतील. या चष्म्याला किंग ऑफ नाईट व्हिजन म्हणूनही ओळखले जाते. प्रजासत्ताक दिनी राजपथवर मोर्चा काढताना सीआरपीएफ कमांडो या चष्म्यासह दिसतील. खास रात्रीसाठी तयार केलेले हे चष्मा कमांडोना 120 डिग्री व्हिजन देतात. जसे आपण दिवसा डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहता ते तसेच आहे. ते खूप हलके असतात आणि ऑपरेशन दरम्यान खूपच आरामदायक असतात.

जगातील अनेक सैन्य या चष्म्याचा करतात वापर
सीआरपीएफ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन सैन्यासह जगातील अनेक सैन्य हा चष्मा वापरतात. कमांडोना रात्री त्यांचे लक्ष्य सहजतेने शोधण्यासाठी हा चष्मा खूप उपयुक्त ठरतो. दरम्यान, अधिकाऱ्याने हे देखील स्पष्ट केले कि, हे चष्मा यूएस नेव्ही सीलसारखे अजिबात नाही. यूएस सीलचे माजी चीफ वॉरफेअर ऑपरेटर मॅट बिस्नोनेट यांनी आपल्या ‘नो इझी डे’ या पुस्तकात या चष्म्याच्या व्हिजनचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मते, ओसामाला ठार मारण्याच्या मोहिमेदरम्यान प्रत्येक सैनिकांना 65 हजार डॉलर्समध्ये फोर ट्यूब नाइट व्हिजन व्हिजन चष्मे देण्यात आला होते. बिस्नोनेटने म्हटले आहे की, चष्म्यामुळे ओसामाला शोधणे खूप सोपे झाले.