‘संस्कार’ शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्कार इंग्लिश मीडियम या शाळेत 300 महिला एकत्र येऊन मानवी झेंडा तयार करून, झेंड्याला मानवंदना व सामूहिक वंदे मातरम गायणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून न्या. श्वेता घोडके व ज्येष्ठ नागरिक प्रा. विजय चोरडिया, शाळेच्या संचालिका मनीषा होळकर, रश्मी दगडे, नंदा डमरे, मुख्याध्यापिका अश्विनी कुशारे, पालक तसेच पालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शाळेतील विद्यार्थ्यांनी परेड, लेझीम व देशभक्तीपर गाणे या विविध कलागुण सादर केले. हर्षल चौरे, दक्षा वर्मा, कनक व गार्गी बोढारे, यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. तसेच अथर्व शेजवळ याने डॉ. आंबेडकर यांचे गीत सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली नाईक, सारिका पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित महिला वर्गाचे उपमुख्याध्यापिका योगिता पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी मंगला कदम, पुष्पा भवर, मनीषा अभंग, सिमरन रामगडिया, कु. स्नेहा साप्ते, प्रियंका क्षीरसागर, सुरेखा भावसार, सीमा होळकर, खुशबू शर्मा, तनुजा न्याहारकर, वैशाली कांगुणे, शबाना काद्री, तसेच सागर धुमाळ, असीम शेख व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

फेसबुक पेज लाईक करा –