Republic Day | देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पिंपरी चिंचवड अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘स्वतंत्रता जयंती पदक’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Republic Day | स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृतमहोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवानिमित्त (Swatantryacha Amrut Mahotsav) भारताच्या राष्ट्रपती सचिवालय कडून अग्निशमन सेवेतील (Fire Brigade) जवानांना ‘स्वतंत्रता जयंती पदक’ प्रदान करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘स्वतंत्रता जयंती पदक’ प्रदान करण्यात आले. (Republic Day)

पिंपरी चिंचवड महापालिकेचे (Pimpri Chinchwad Municipal Corporation) आयुक्त तथा प्रशासक (Commissioner and Administrator) शेखर सिंह (Shekhar Singh), अतिरिक्त आयुक्त-1 प्रदिप जांभळे पाटील (Addl Commissioner-1 Pradip Jambhale Patil), सहायक आयुक्त तथा मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पार्श्वभूमीवर ‘स्वतंत्रता जयंती पदका’ने सन्मानित करण्यात आले.

राज्यातील महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अग्निशमन विभागातील सर्व जवानांना अशा
प्रकारे सन्मानित करण्यात आले आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या
हस्ते सन्मानित करण्यात आले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Web Title :- Republic Day | ‘Independence Jubilee Medal’ to Pimpri Chinchwad Fire Brigade officers and employees on the occasion of 75 years of Independence of the country

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pathaan | … आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?, ‘पठाण’ चित्रपटावरून मनसेचा हल्लाबोल

Maharashtra Politics | परभणीत शिंदे गट राष्ट्रवादीला सुरूंग लावण्याच्या तयारीत; राष्ट्रवादीचा मोठा नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

Jitendra Awhad | शरद पवार यांच्यावरील ‘त्या’ विधानावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना सुनावले; म्हणाले…