काय सांगता ! होय, ‘या’ नामांकित कंपनीचे मोबाईल झाले तब्बल 6 हजारांनी ‘स्वस्त’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तुमचा फोन खराब झाला असेल किंवा नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर कमी किमतीत जास्त फिचर्स असलेला Xiaomi चा मोबाईल एक चांगला पर्याय आहे. या कंपनीकडून 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्राहकांसाठी खास धमका ऑफर्स देण्यात आल्या आहेत. Xiaomi च्या वेबसाईटवर आज प्रजासत्ताक दिनानिमित्त खास Republic Day Sale आहे.

या सेलचा आजचा शेवटचा दिवस असल्याने 6 हजार रुपयांची सुट तुम्हाला मोबाईल खरेदीवर मिळणार आहे. शाओमी कंपनीच्या बेबसाईटवर आज 6 हजार रुपयांनी स्वस्त मोबाईल तुम्ही खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्ही नवीन मोबाईल घेणार असला किंवा जुना एक्सचेंज करणार असाल तर आजची ही संधी सोडू नका.

रेडमी नोट 8 प्रो हा मोबाईल 14 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच तुम्हाला एक हजार रुपयांची अतिरिक्त सुट मिळू शकते. हा मोबाईल 6 GB, 64 GB आणि 128 GB स्टोअरेज असे वेरियंट या मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. यापैकी 6 GB असलेला मोबाईल 15 हजारापर्यंत मिळणार आहे. तसेच यामध्ये 648 मेगापिक्सल कॅमेरा असून 4500 mAh Battery या मोबाईलमध्ये आहे. निळा, काळा आणि पांढरा या तीन रंगामध्ये हा मोबाईल फोन उपलब्ध आहे.

शाओमी सिरीजमध्ये K20 आणि K20 pro अशा दोन मोबाईलवर डिस्काऊंट मिळणार आहे. या मोबाईलवर 4 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. तसेच एक हजार रुपयापर्यंत इतर डिस्काऊंट आणि कॅशबॅक अशा धमाकेदार ऑफर्सचा फायदा ग्राहकांना मिळणार आहे. Redmi Note 8 Republic Day Sale मध्ये 4 कॅमरा असलेला आणि जास्त फीचर्स 10 हजार रुपयापर्यंत बजेट असणाऱ्यांसाठी सगळ्यात चांगला फोन आहे. हा फोन तुम्हाला 9999 रुपयात मिळणार आहे. तसेच 1 हजार रुपयांचा इतर डिस्काऊंट आणि कॅशबॅक अशी धमका ऑफर तुम्हाला मिळणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

 

You might also like