26 जानेवारीच्या हल्ल्याचा कट उधळला, ‘जैश’च्या 5 दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर पोलिसांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा डाव उधळून लावला आहे. काही दहशतवादी प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी मोठ्या हल्ल्याचा कट रचत होते. जम्मू काश्मीर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे त्यांचा हल्लाचा डाव हाणून पाडला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हल्ल्याचा कट रचणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या 5 आतंकवाद्यांना जम्मू काश्मीर पोलिसंनी अटक केली आहे. त्यांचा हल्ल्याचा कट अयशस्वी झाला आहे. हे पाच आतंकवादी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत होते.

एएनआयच्या माहितीनुसार, श्रीनगर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदच्या आतंकवादी मोड्युलचं भांडं फोडलं आहे. पाच जणांना अटक करत ताब्यात घेतलं आहे. सदर पाचही आतंकवादी 26 जानेवारी रोजी ग्रेनेड हल्ला करण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी त्यांचा डाव अयशस्वी केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/