‘रिपाइं’साठी अच्छे दिन ! अविनाश महातेकर यांची मंत्रिमंडळात वर्णी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील राज्य सरकारचा विस्तारावरून बरीच चर्चा झाली, अखेर राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार १६ जूनला होणार असून यात रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांची वर्णी लागली असून ते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याबाबतची माहिती रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी दिली. रिपब्लिकन पक्षाकडून महातेकर यांचे नाव अधिकृतरित्या मुख्यमंत्र्याकडे पाठवण्यात आले आहे.

ते आश्वासन पुर्ण –

राज्यमंत्री मंडळाचा विस्तार येत्या रविवारी होणार असून रिपब्लिकन पक्षाकडून एकाचे नाव मंत्रीमंडळात मंत्री म्हणून द्यावे असे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीर करण्यात आले होते, त्यानंतर अविनाश महातेकर यांच्या नवाची शिफारस रामदास आठवले यांनी केली आहे. उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी रिपाइंला सत्तेत वाटा देण्यात येईल आणि मंत्रिमंडळात देखील स्थान देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. ते पुर्ण केल्यानंतर रामदास आठवले यांनी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

राज्य सरकारचा मंत्रिमंडळाच्या विस्तारात आरपीआयला मंत्री पद देण्यात आले असले तरी आता राज्य सरकारचा कार्यकाळ खूप कमी राहिला आहे. देवेंद्र फडणवीस आता आपल्या सहकाऱ्यांबरोबर पुढील योजनांची आखणी करत आहे.

सिनेजगत

आजही ‘या’ अभिनेत्याला मुलं घालतात लग्‍नाची मागणी, येतात अश्‍लील मेसेज्स

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत

Video : ‘तशा’ अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने ‘हॉटनेस’च ‘दर्शन’ दिल्याने वातावरण ‘टाईट’