तीर्थक्षेत्र जेजुरीच्या मल्हारी मार्तंडाची जगभरात ख्याती

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) –  जेजुरीच्या खंडोबाची जगभर ख्याती आहे. नुकतेच इंग्लंडच्या प्रसिद्ध आय स्टुडिओ टीव्हीचे ख्यातनाम दिग्दर्शक रिचर्ड मॅकिन्सन आणि केविन फोर्डे तसेच मुंबईचे अमित आणि अकबर खान यांनी जेजुरी गडाला भेट दिली. येथील सांस्कृतिक उत्सव आणि यात्रा इंग्लंडच्या प्रसारमाध्यमातून प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

त्यांनी पायरीमार्गाने गडावर येऊन कपाळी भंडारा लावून खंडोबाचे दर्शन घेतले. देवाची बेचाळीस किलो वजनाची तीनशे वर्षांपूर्वीची ऐतिहासिक तलवार (खंडा) आणि कसरत करणारे कलाकार पाहून आश्चर्य व्यक्त केले. गडावरील दीपमाळा, दगडी कासव, गडकोट गडावरून दिसणारे मंदिराचे विलोभनीय दर्शन त्यांना भावले. याबाबत त्यांनी श्रीमार्तंड देवसंस्थान कार्यालयास भेट देऊन विश्वस्त संदीप जगताप यांच्याशी संवाद साधला.

जगताप यांनी या विदेशी पाहुण्यांचा सत्कार केला. इंग्लंडमध्ये कित्येक पिढया राहणारा परिवार हा भारतीय वंशाचा असल्याचे त्यांनी सांगितले. परिवाराचे दैवत ज्ञात असल्याचेही केविन फोर्डे यांनी सांगितले. या परिवाराच्या माध्यमातून आम्ही इंग्लंडच्या प्रसारमाध्यमांवर जेजुरीचा खंडोबा एक जागतिक सांस्कृतिक दैवत म्हणून ‘भारतीय एक प्रवास’ या कार्यक्रमातून प्रसारित करणार आहोत.

अनेक परदेशींकडून अभ्यास यापूर्वी गुथंर सोन्थ्यामार जर्मन खंडोबा साहित्य अभ्यासकाची प्रेरणा घेऊन पाब्लो होलटेट यांनी पीएच.डी. केली होती. रशिया, जपान, अमेरिका आदी देशातून अनेक विदेशी पर्यटक अभ्यासक जेजुरीच्या खंडोबाच्या अभ्यासासाठी येऊ लागले आहेत.

Visit – policenama.com