१२ बलुतेदार समाज विकास संघाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

 पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बारा बलुतेदार समाज विकास संघाच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना विविध मागण्याचे निवेदन दिले . यावेळी बारा बलुतेदार समाज विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी , प्रदेश सचिव राजेंद्र पंडित , प्रदेश निरीक्षक राजाभाऊ पोटे , सल्लागार शैलेश बडदे , पुणे शहराध्यक्ष राजेश भोसले , पर्वती विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी लवकरच बैठक घेऊ हा विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले .

बारा बलुतेदार संरक्षण कायदा राज्यात तयार करून त्याला ऍट्रॉसिटीच्या धर्तीवर रूपांतरित करण्यात यावे, बारा बलुतेदारासाठी १०० कोटीचा निधी खादी ग्राम उद्योग मार्फत वितरित होताना प्रक्रिया सुलभ करावी, बँकिंग बाबत अडचणी येतात त्याबाबत सुलभता आणावी, ५० हजार खाडी ग्रामोद्योग मार्फत बारा बलुतेदारांना विनातारण देण्यात यावे . नाना वाड्यातील स्वराज्य संग्रहालयात हुतात्मा भाई कोतवाल व बलुतेदार हुतात्मे यांचा इतिहास समावेश करावा . या मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या .

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या