‘ती’ पाकची मानसिक खेळी, नेटकऱ्यांनो अभिनंदन यांचे फोटो , व्हिडीओ शेअर करू नका … !

श्रीनगर : वृत्तसंस्था – मिग – २१ या विमानाचा वैमानिक, वायुसेनेचा विंग कमांडर अभिनंदन सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. पाकिस्तानने यासंदर्भातला व्हिडीओ देखील प्रसिद्ध केला आहे. पण भारतीय वायुसेनेच्या वैमानिकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणे म्हणजे पाकिस्तानची भारताविरुद्ध केली जाणारी मानसिक खेळी आहे असे सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अभिनंदन यांचा सोशल मिडीयावर व्हायरल होणारा व्हिडीओ नेटिझन्सनी थांबवावा.असे आवाहन देखील सुरक्षा यंत्रणे कडून करण्यात आले आहे.

पाकचे ‘सायकोलॉजिकल ऑपरेशन’ – पाकिस्तानी सैन्याकडून एकूण पाच व्हिडीओ चित्रित करण्यात आले असून ‘सायकोलॉजिकल ऑपरेशन’ अर्थात मानसिक दबाव आणण्यासाठी व्हाट्सअँप, ट्विटर ,फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मिडियावर व्हायरल केले जात आहे. असे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले. सुरक्षा यंत्रणा आणि नागरिकांचं मनोधैर्य कमी करण्याचं पाकिस्तानचं उद्दिष्ट असल्याचं सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केलं. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने बंदीवान केल्यानंतरचे व्हिडिओ भारतात अनेक नेटिझन्सनी शेअर केले असून पाकिस्तानविरोधात आग ओकली आहे.

विंग कमांडर अभिनंदन यांचे कोणतेही व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करु नका, असं आवाहन भारतीय सैन्याने केलं आहे . पाकिस्तानी सैन्य आणि मीडियाकडून हे फोटो पसरवले जात असल्याची माहिती आहे.

मिग-21 बायसन विमानातून एका विंग कमांडरला सुरक्षितपणे स्वतःला बाहेर काढलं, मात्र ते एलओसीजवळ लँड झाल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतलं. पाकिस्तानच्या ताब्यात फक्त एकच पायलट असून विंग कमांडरला लष्कराच्या नैतिकतेनुसार वागवलं जात असल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला आहे.