1 लाख मुलांची PM नरेंद्र मोदींकडं ‘दया-याचना’, पत्राद्वारे प्रकट केली ‘इच्छा’

जिंद : वृत्तसंस्था – 4 ते 19 वर्षांच्या वयात मोठं बलिदान देणाऱ्या देशभरातील अनेक मुलांना सन्मानानं त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी जिंदपासून सुरू झालेली मोहिम शुक्रवारी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचली. एक लाख शालेय विद्यार्थ्यांनी पीएम मोदींच्या नावानं लिहलेले पत्र जिंदमध्ये डी ए व्ही संस्थांचे प्रादेशिक संचालक डॉ धर्मदेव विद्यार्थी यांना त्यांच्या कार्यालयात पोहोचले आहे. एक लाख मुलांच्या या पत्रानंतर शुक्रवारी डॉ. धर्मदेव विद्यार्थी आणि इतर अनेक संघटनांशी निगडीत लोकांनी पीएम मोदींच्या नावानं डॉ. आदित्य दहिया यांच्याकडे एक निवेदन दिलं.

या पत्रात अशी मागणी केली गेली आहे की, देशासाठी बलिदान देणाऱ्या मुलांच्या स्मरणार्थ 28 डिसेंबर रोजी बाल बलिदान दिवस घोषित करण्यात यावा. आदित्य दहिया यांनी निवेदन देणाऱ्यांना आश्वासन दिलं आहे की, हे निवेदन पीएम कार्यालयापर्यंत नक्की पोहोचवलं जाईल. डॉ. धर्मदेव विद्यार्थी आणि जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थांशी संबंधित लोक शुक्रवारी सकाळी डीसी कार्यालयात पोहोचले होते. त्यांनीच हे निवेदन दहियांकेड सोपवलं. निवेदनात म्हटलं आहे की, एक लाख शालेय मुलांनी अशी मागणी केली आहे की, ज्या मुलांनी देश आणि धर्माच्या रक्षणासाठी लहानपणीच (4 वर्ष ते 19 वर्षांच्या वयात)बलिदान दिलं आहे त्यांच्या स्मरणार्थ 28 डिसेंबर रोजी बाल बलिदान दिवस घोषित केला जावा.

भारताच्या इतिहासात असे अनेक बाल वीर आहेत ज्यांनी देश आणि धर्मासाठी स्वत:चं बलिदान दिलं आहे. यात वीर हकीकत राय पासून ते स्वातंत्र्य लढ्यात प्राणांचं बलिदान देणाऱ्या 6 वर्षीय रघुनाथ याशिवाय बाल वीरांगनांमध्ये 8 वर्षीय मैना, हरशरण कौर, कालीबाई यांचा समावेश आहे. गुरु गोंक्षबद सिंह यांचे शहजादे 6 वर्षीय फतेह सिंह आणि 9 वर्षीय जोरावर सिंह यांनी हसत हसत देश आणि धर्माच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/