पळवून नेत लवासाच्या जंगलात लपविलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी केली सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नाच्या अमिषाने अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिला लवासाच्या जंगलांमध्ये लपवून ठेवले. पोलिसांकडे तीन महिन्यांपुर्वी यासंदर्भात तक्रार आली होती. काहीच धागादोरा लागत नव्हता. परंतु पोलिसांना एक धागा मिळाला आणि हिंस्त्र प्राण्यांची, जंगलाची तमा न बाळगता पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने तिला शोधून काढले आणि तिची सुटका केली.

चतुश्रृंगी पोलिसांकडे एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार आली होती. ८ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मात्र मुलीचा पत्ता लागत नव्हता. मुलीला पळवून नेताना २१ वर्षीय तरुणाने काहीही मागमूस ठेवला नव्हता. तेने तिला ८ फेब्रुवारीला पळवून नेले. तेव्हापासून तो मोबाईल वापरत नव्हता. परंतु सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस नाईक किरण अब्दागिरे यांना एक धागा मिळाला. त्यांनी तांत्रिक विश्लेषण केले तेव्हा ते मुळशी तालुक्यातील तव या गावी असल्याची माहिती त्यांना मिळाली.

त्यानंतर पथकाने लवासाच्या पाठीमागील जंगलात आणि डोंगरांवर जाऊन तिचा शोध घेऊ लागले. पोलिसांनी कोणत्याही हिंस्त्र प्राण्यांची तमा न बाळगता तेथे शोध घेतला. त्यानंतर तव गावाजवळील एका झोपडीत ती मिळून आली. तरुणाने तिला पळवून नेत दुरच्या आजी आजोबांसोबत ठेवले होते. तसेच दररोज लागणारे धान्य व किराणा त्ये आधीच आणून ठेवला होता. पोलिसांनी त्याला चतुश्रृंगी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तर मुलीची सुटका केली आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगिता कुदळे, हवालदार रमेश लोहकरे, ननिता येळे, राजेंद्र ननावरे, निलेश पालवे, संदीप गायकवाड आणि किरण अब्दागिरे यांच्या पथकाने केली.