Health Tips : ‘चॉकलेट’ खाल्ल्याने कमी होतो ‘हार्ट’ डिसीजचा धोका, रिसर्चमध्ये दावा

पोलीसनामा ऑनलाईन : चॉकलेट खाणे हार्टसाठी चांगले आहे. हे एका रिसर्चमधून समोर आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, आठवड्यातून किमान एकदा चॉकलेट खाल्ल्याने हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो. हा अभ्यास यूरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डियोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे. मात्र, कोणत्या प्रकारचे चॉकलेट यासाठी खावे याबाबत संशोधकांनी स्पष्ट सांगितलेले नाही.

रिसर्चमधील महत्वाचे मुद्दे

1 चॉकलेट ब्लड प्रेशर आणि ब्लड व्हेसल लायनिंग दोन्हीसाठी लाभादायक आहे.
2 आठवड्यात एकापेक्षा जास्तवेळा चॉकलेट खाल्याने 8 टक्के आर्टरी डिसीजचा धोका कमी होतो.
3 चॉकलेटमध्ये हार्टला निरोगी ठेवणारे पोषकतत्व आहे.
4 फ्लेवोनोईड, मिथाईलक्सॅन्थिन, पॉलीफेनोल आणि स्टीयरीक अ‍ॅसिड सूज कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात.

असे केले संशोधन
संशोधकांनी मागील पाच दशकांपासून चॉकलेटची मागणी आणि कोरोनरी आर्टरी डिसीज यातील संबंधाचा शोध घेणार्‍या अभ्यासात एक कंबाईन अ‍ॅनालिसिस केले. अ‍ॅनालिसिसच्या 6 स्टडीमध्ये 336,289 लोकांनी भाग घेतला. त्यांनी आपल्या चॉकलेट कंज्यूम करण्याबाबत सांगितले. सुमारे नऊ वर्षात 14,043 लोकांना आर्टरी डिसीज झाला आणि 4,667 लोकांचा हृदयविकाराचा झटका आला.

जास्त चॉकलेट खाणे त्रासदायक
संशोधकांनी सांगितले आहे की, जास्त प्रमाणात चॉकलेट खाऊ नये. मध्यम मात्रेत चॉकलेट कोरोनरी धमण्यांचे रक्षण करते, परंतु जास्त मात्रेत चॉकलेट खाल्याने नुकसान होते.