हँडसम पुरुषांमध्ये असते स्पर्मची सर्वाधिक कमतरता ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगात प्रत्येक महिलेला हँडसम आणि आकर्षक पुरुष हवा असतो. असेच पुरुष त्यांना जास्त आवडतात. परंतु ताज्या रिपोर्टमध्ये असं समोर आलं आहे की, आकर्षक पुरुष पार्टनरला खुश ठेवण्यात जास्त यशस्वी होत नाहीत. आज हेच जाणून घेणार आहोत की, हँडसम पुरुषांची स्पर्म क्वालिटी खरंच खराब असते का. सविस्तर जाणून घेऊयात.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, जे पुरुष जास्त हँडसम किंवा आकर्षक दिसतात त्यांची स्पर्म क्वालिटी जास्त चांगली नसते. अशा पुरुषांना बाप व्हायला जास्त काळ लागतो. स्पेनच्या एका विद्यापीठात 62 पुरुषांवर फीनोटाईप लिंक्ड फर्टिलिटची हायपोथिसीस (PLEH)च्या माध्यमातून स्पर्म क्वालिटी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या रिसर्चमधून ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्या खूपच चकित करणाऱ्या होत्या.

या संशोधनातील संशोधकांनी सांगितलं की, जर एखाद्या महिलेला वाटत असेल की, तिला हेल्दी आणि मॅच्युर बाळ हवं आहे तर तिनं तिनं पार्टनरच्या हँडसम चेहऱ्यावर जाता कामा नये.

रिसर्चनुसार, टेस्टॉस्टेरॉनची वाढती पातळी शुक्राणूचं उत्पादन खराब करते. रिसर्चमध्ये 50 पुरुषांच्या स्पर्मचं इज्यॅक्युलेशननंतर निरीक्षण करण्यात आलं. शुक्राणूंच्या गतीशिलतेची आणि एकाग्रतेची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशच्या नियमांनुसार तपासणी करण्यात आली. यात असं समोर आलं आहे की, हँडसम पुरुषांपेक्षा इतर पुरुषांची स्पर्म क्वालिटी चांगली असते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like