COVID-19 : जगभरात ‘कोरोना’च्या वॅक्सीनवर संशाधन युध्दपातळीवर सुरू, जाणून घ्या कितपत मिळालं ‘यश’ ?

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत १३,२४०,४३४ जणांना याची बाधा झाली आहे. तर ५ लाख ७५ हजार ६०१ जणांचा मृत्यू या संसर्गामुळे झाला आहे. या संसर्गाला रोखण्यासाठी जगातील विविध देश लस शोधत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्यानुसार, जगभरातील सुमारे ८० वैद्यकीय संस्था १०२ लसींवर काम करत आहेत. तसेच अनेक देशात या लसींचे मानवी परीक्षण देखील सुरु झाले आहे. चला तर पाहूया कोणत्या देशात कोरोना संसर्गाच्या लसींवर काम सुरु आहे आणि त्यांना कितपत यश प्राप्त झालं आहे.

१. चीनमध्ये लसीचे प्रशिक्षण

चीनच्या वुहान प्रांतातून कोरोनाचा संसर्ग जगभरात पसरला. दरम्यान आता चीन या संसर्गावर लस शोधत आहे. येथील प्रसिद्ध कंपनी सिनोवेक बायोटेक यावरती काम करत आहे. तसेच कॅनसिनो बायोलॉजी आणि वुहान इन्सिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्टस या कंपन्या देखील लस तयार करत आहेत. त्यांची लस परीक्षणाच्या पहिल्या टप्प्यात आहे.

२. अमेरिकेत लसीच्या चाचण्या अंतिम टप्य्यात

येथील फार्मास्युटिकल कंपनी मॉडर्ना सुद्धा लशींवर काम करत असून, त्यांचे परीक्षण अंतिम टप्प्यात पोहचले आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, २०२० च्या अखेरपर्यंत लस तयार होईल. अमेरिकेच्या इतर २ कंपन्या, फायजर आणि जॉन्सन अँड जॉन्सनदेखील लस शोधण्याच्या कामात गुंतले आहेत. तर गिलियाड सायन्सने रेमडेसिवीर नावाचे औषध बनवले आहे, जे हाइड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधापेक्षा जास्त परिणामकारक मानले जात आहे. कोरोना संसर्गाच्या गंभीर रुग्णांवर रेमडेसिवीरचा चांगला परिणाम होतो असे प्राथमिक संशोधनानुसार समोर आले आहे.

३. ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे संशोधन

ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे केलेल्या दाव्यानुसार त्यांनी तयार केलेल्या लशीला ८० टक्के यश मिळू शकते. मागील महिन्यात त्यांनी पहिल्या टप्प्यातील चाचण्या केल्या, त्याचे त्याचे सकारात्मक असे परिणाम दिसून आले आहे.

४. इटलीत उंदरावर प्रयोग

इटलीच्या टॅकिज बायोटेक कंपनीने लस शोधल्याचा दावा केला आहे, तसेच त्यांचे संशोधन खूपच पुढं गेल्याच त्यांनी म्हटलं आहे. टॅकिज कंपनीचे सीईओ ओरीसिचिओ यांनी सांगिल्यानुसार, संशोधन सुरु असून ही लस मानवी पेशीवर काम करेल. सध्या या लसीचा उंदरावर प्रयोग केला जात आहे. ज्यात उंदरांमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होत आहे.

५. नेदरलँडमध्ये लसीचा शोध

कोरोना संसर्गाच्या स्पाइक प्रोटीनला जखडून टाकतील अशी प्रतिजैवक नेदरलँडमधील संशोधकांनी शोधून काढली आहेत. त्यांनी हे स्पाइक प्रोटीन उंदरांमध्ये सोडले, त्यानंतर त्यांच्यात निर्माण झालेली ५१ प्रतिजैवके वेगळी करण्यातील आली. त्यातील एक प्रतिजैवक संसर्गाला रोखण्यात यशस्वी झालं आहे.

६. इज्राइल बनवत आहे प्रतिकारशक्ती मजबूत करणारे औषध

इज्राइल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चने एक प्रतिजैविक तयार केलं आहे. जे मोनॉक्लोनप्रमाणे कोरोना संसर्गावर हल्ला करेल. पण या लसीचे परीक्षण प्राण्यांवर सुरु असून मानवांवर हे कितपत यशस्वी ठरेल, यासंदर्भात अजून माहिती मिळालेली नाही.

७. रशियाने लस बनवल्याचा केला दावा
रशियातील सेशेनोव्ह विद्यापीठाने कोरोना संसर्ग प्रतिबंध लसीच्या सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचा दावा केला आहे. सर्व चाचण्या पूर्ण करणारी ही जगातील पहिली कोरोना संसर्ग प्रतिबंध लस ठरेल.

८. भारत सुद्धा आघाडीवर

भारतातील इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेक इंटरनेशनलने एकत्र येऊन कोरोना संसर्गावर लस शोधण्याचे काम सुरु केले आहे. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी पुण्यात वेगळ्या केलेल्या विषाणूच्या स्ट्रेनचा उपयोग केला जातो आहे. आईसीएमआरच्या दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये वेगळ्या करण्यात आलेल्या विषाणूचा स्ट्रेन यशस्वीरीत्या भारत बायोटेक इंटरनेशनलमध्ये पाठवण्यात आला असून, त्यावरती लस निर्माण करण्याचे काम सुरु झाले आहे.