दातांना किड लागू नये म्हणून समोर आला खास उपाय, दातांचं दुखणंही सहज होईल दूर ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   एका रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, च्युईंगम चघळल्यानं दातांना किड लागत नाही किंवा आधीच जर किड लागली असेल तर यामुळं ती वाढत नाही. खास बात अशी की, ज्यांनी हा अभ्यास केला आहे त्यात एक भारतीय अभ्यासकही आहे.

या रिसर्चचे मुख्य लेखक किंग्स कॉलेज लंडनमधील प्राध्यापक भारतीय वंशाचे अविजीत बॅनर्जी यांनी सांगितलं की, “लाळेत असणारी उत्तेजना ही ज्या दातांना किड आहे आणि ज्या दातांना किड नाही अशा दोन्ही दातांमध्ये रक्षक म्हणून काम करते. च्युईंगम चघळल्यानं एका दाताचं इंफेक्शन दुसऱ्या दातामध्ये पसरण्यापासून रोखलं जातं.

शुगर फ्री च्युईंगम हे जॅलिटॉल आणि सोर्बिटॉलसहित अँटी बॅक्टेरियल तत्वांना कॅविटी पर्यंत पोहोचवण्याचं कामही करतं. यामुळं एका दाताला लागलेली किड ही दुसऱ्या दाताला लागत नाही.

अभ्यासकांनी केलेल्या या रिसर्चमध्ये गेल्या 50 वर्षात प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चचं विश्लेषण करण्यात आलं. यातील 12 रिसर्च शोधून काढून त्यांची तुलना करण्यात आली. या रिसर्चमध्ये लहान आणि मोठ्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासाचा समावेश आहे. यात ओरल हेल्थ कंडीशन, शुगर फ्री गम चघळण्याचा प्रभाव आणि कॅविटी वाढण्याची कारणं व्यवस्थित सांगण्यात आली आहेत.

जर दातांना किड लागली असेल तर ती किड पसरण्यापासून रोखण्यात 28 टक्के फायदा एकट्या गम चघळल्यानं होतो असं या अभ्यासातून समोर आलं आहे. या रिसर्चबाबत बॅनर्जी यांनी सांगितलं की, शुगर फ्री गम चघळल्यानं दातांची किड रोखण्यात आणि ओरल हेल्थ चांगली ठेवण्यात मदत मिळते असं आम्हाला या रिसर्चमध्ये आढळून आलं आहे.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.