धावण्याची ‘ही’ पद्धत लवकर वजन कमी करण्यासाठी परफेक्ट, जाणून घ्या कशी

पोलीसनामा ऑनलाइन – अनेकजण वजन करण्यासाठी धावत असतात. परंतु तुम्हाला माहित आहे का उलटं धावल्यानं जास्त वजन कमी होतं. होय रिसर्चमधून हा खुलासा झाला. यासंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत.

ब्रिटनमध्ये उलटं धावण्यावर एक रिसर्च करण्यात आला. यात 26 महिलांचा सहभाग होता. या महिलांना 6 आठवडे उलटं धावण्यासाठी सांगण्यात आलं. ज्या महिला रोज 15 ते 45 मिनिटे उलटं धावत होत्या. त्यांचं 2.5 टक्के वजन कमी झालं होतं. उलटं धावल्यानं गुडघड्याच्या समस्याही दूर होतात असं युनिव्हर्सिटी ऑफ मिलान आणि कराडिफ युनिव्हर्सिटीच्या काही अभ्यासकांचं तसं मत आहे. आज उलटं धावण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

1) मूड फ्रेश राहतो – सरळ धावताना तुम्ही तुझे पुढील बाजूस वाकता यां पाठीचं आणि मानेचं दुखणं होऊ शकतं. याउलट उलटं धावताना तुम्हाला ताठ रहावं लागतं. रोज धावल्यानं मूड चांगला राहतो तुम्ही काम करूनही फ्रेश दिसता.

2) वजन कमी होतं – उलटं धावल्यानं 20 टक्के जास्त कॅलरीज बर्न होत असतात यामुळं लवकरच वजन करण्यास मदत होते.

3) हृदयरोगांचा धोका होतो – यामुळं हृदयरोगांचा धोका कमी होतो. तणावपूर्व वातावरणात काम केल्यानंतर थोडं धावायला हवं.

4) एकाग्रता वाढते – उलटं धावताना तुम्हाला जास्त मेहनत करावी लागते. मेंदूचं पूर्ण लक्ष धावण्यावर ठेवावं लागतं. यामुळं एकाग्रता वाढते.

5) शरीरासाठी अनेक फायदे – जेम्स बॉम्बर यांनी ब्रिटनमध्ये उलटं धावण्याच स्पर्धा घेतली होती. ते सांगतात की, उलटं धावल्यानं तुमच्या पायाच्या दुसऱ्या टोकावर जास्त भर दिला जातो. यामुळं तळपाय आणखी मजबूत होतात. शरीराचा बांधा सरळ राहतो. सामान्यपणे धावल्यानं जो फायदा त्यापेक्षा कैकपटीनं जास्त फायदा उलटं धावण्यानं होतो.