संशोधक विद्यार्थ्यांसाठी ‘अच्छे दिन’ ; कनिष्ठ-वरिष्ठ विद्यार्थ्यांच्या ‘फेलोशिप’मध्ये वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विज्ञान, मानसशास्र आणि सामाजिकशास्रमध्ये संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अच्छे दिन आले आहेत. कारण विद्यापीठ अनुदान आयोगाने जुनियर रिसर्च फेलोशिप आणि सिनियर रिसर्च फेलोशिप ६ ते ७ हजारांनी वाढवण्यासाठी मंजुरी दिली आहे.

विज्ञान, मानसशास्र आणि सामाजशास्र (यूजीसी नेट) मध्ये जेआरएफ च्या विद्यार्थ्यांना २५,००० हजार रु. फेलोशिप मिळत होती. ती आता ३१,००० हजार रु. मिळणार आहे. तर एसआरएफ च्या विद्यार्थ्यांना महिन्याला २८,००० फेलिशीप मिळत होती. ती ३५,००० हजार रु. मिळणार आहे. असं UGC चे सचिव रजनीश जैन यांनी सांगितलं.

विद्यापीठ अनुदान आयोगाने २६ फेब्रुवारी २०१९ ला ५३९ व्या बैठकीत मानसशास्र आणि समाज विज्ञानमध्ये जेआरएफ आणि एसआरएफ च्या फेलोशिप वाढीला मंजुरू दिली आहे. अशी माहिती यूजीसी ने दिली आहे.

यात घरभाडे भत्ता ८ टक्के, १६ टक्के, आणि २४ टक्के सरकारचं नियमानुसार संशोधकाला दिले जातील. बाकीचे नियम १२ व्या पंचवार्षिक योजना, विद्यापिठ अनुदान आयोग आणि जेआरएफ नुसार समान राहतील. फेलोशिप वाढल्यामुळे संशोधकाचा संशोधनातील रसही वाढेल. आणि नवीन शोधही लागतील.