चहामुळे जीवघेण्या हृदयरोगाचा धोका 56 टक्क्यांनी कमी होतो, जाणून घ्या ‘कप ऑफ टी’ चे फायदे

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – चहाचा एक कप तुम्हाला अनेक रोगांच्या प्रादुर्भावापासून दूर ठेवू शकतो. ‘यूरोपियन जर्नल ऑफ प्रिवेंटिव कार्डियोलॉजीने याबाबत मोठा खुलासा केला आहे. संशोधकांचे असे म्हणणे आहे की, आठवड्यातून तीनदा किंवा जास्त वेळा चहा पिल्याने हृदयाच्या अनेक आजारांपासून सुटका मिळते. बीजिंगमधील चिनी अकॅडमीने यावर मोठा रिसर्च केला आहे. यामध्ये 100,902 अशा लोकांचा अभ्यास करण्यात आला ज्यांना हार्टअटॅक, स्ट्रोक किंवा कॅन्सर संबंधित कोणताच आजार नव्हता. या लोकांचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आले होते.

पहिल्या गटात असे लोक होते जे आठवड्यातून दोन ते तीन वेळा चहा प्यायचे तर दुसऱ्या गटात असे लोक होते जे चहाच पित नव्हते. 7.3 वर्ष संशोधकांनी पाठपुरावा केला. त्यानंतर जे लोक चहा पित होते ते अधिक काळासाठी निरोगी राहिल्याचे समोर आले. चहा न पिणाऱ्यांना हृदय रोग सारखे आजार होण्याची लक्षणे वाढली होती.

या अभ्यासामध्ये 14,000 हून अधिक लोकांच्या उपसमूहांचे आकलन देखील करण्यात आले. या दोन्ही अभ्यासांमधून चहा प्यायलेल्यांना अधिक स्पष्ट फायदे दिसून आले. ज्यामध्ये प्राणघातक हृदयरोग आणि स्ट्रोकचा 56 टक्के कमी धोका असल्याचे समजले. तज्ञ म्हणतात की हे संशोधन निरिक्षणात्मक अभ्यास होता.

यामुळे चहा आहे फायदेशीर
तज्ज्ञांचे म्हणणे आहे कीचहातील पॉलिफेनॉल – ब्लॅक टी आणि ग्रीन टी दोन्हीमध्ये आढळणारे सेंद्रिय रसायने यामुळे आरोग्याला फायदा होतो. पॉलीफेनॉल वनस्पतींमधून तयार होतो, खासकरून फुलांच्या वनस्पतींपासून अशी माहिती न्यूयॉर्कमधील लेनोक्स हिल हॉस्पिटलचे हृदय रोग तज्ज्ञ डॉ. सतजित भुश्री यांनी दिली.

पॉलीफेनोल्समुळे रक्त वाहिन्यांमध्ये सुधारणा होते. तज्ञ् सांगतात की, पॉलीफेनोल्स खूप काळासाठी शरीरात टिकून राहत नाही. त्यामुळे वारंवार चहा पिल्याने पॉलीफेनोल्सचा फायदा होतो. काळ्या आणि हिरव्या दोनीही चहाच्या पानामध्ये पॉलीफेनोल्सचे प्रमाण असते.

 

फेसबुक पेज लाईक करा –