Coronavirus : आवाज ऐकून कोविड – 19 चे लक्षण सांगणारे अ‍ॅप तयार, असे करणार काम

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. कोरोनासंबंधित आता अनेक अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत. कार्नेगी मेलन यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी व्हॉइसचे विश्लेषण करुन कोरोनाचे लक्षण ओळखणारे अ‍ॅप तयार केले आहे.

असे असले तरी या अ‍ॅपवर पूर्णपणे विश्वास ठेवला जाऊ शकत नाही.अ‍ॅपच्या माध्यमातून व्हॉइस विश्लेषण करुन जे परिणाम तेथे दिसतील या आधारे लोक कदाचितच ठरवू शकतील की कोरोना टेस्ट करण्याची आवश्यकता आहे की नाही.

या अ‍ॅपचे नाव कोविड Voice Detector ठेवण्यात आले आहे. हे अ‍ॅप फक्त व्हाइसचे विश्लेषण करत नाही, एवढेच नाही तर तुम्हाला की प्रश्न देखील विचारले जातील. कार्नेगी मेलन यूनिवर्सिटीचे एक संशोधन बेनजामिन स्ट्रिनरने हे सांगितले आहे की अनेक अ‍ॅप आहेत जे स्वस्तात आणि वेगाने डायग्नोसिस करण्याचा दावा करत आहेत. यातील काही चांगले देखील आहे, परंतु या प्रकराचे अ‍ॅप आलेले नाही.

कसे काम करते अ‍ॅप –
हे अ‍ॅप लॉग इन करताना तीन वेळा खोकण्यास सांंगितले जाईल. यानंतर तुम्हाला काहीतरी बोलावे लागेल, अ‍ॅपच्या मते याद्वारे त्या व्यक्तीच्या फुफ्फुसांचे विश्लेषण केले जाईल.

अ‍ॅपने दावा केला आहे की या पूर्ण प्रोसेससाठी 5 मिनिटांचा कालावधी लागेल. चाचणीच्या अखेरीस तुम्हाला 1 ते 10 दरम्यान रिझल्ट दाखवेल. या स्कोरच्या आधारे तुम्हाला हे लक्षात येईल की तुम्हाला कोविड – 19 ची लक्षण आहेत की नाही.

टेस्टपूर्वी यूजर्सला आपले वजन आणि उंचीची माहिती त्यात भरावी लागेल. संशोधकांचे स्पष्ट मत आहे की ही कोणतीही डायग्नोस्टिक सिस्टम नाही. यामुळे याकडे मेडिकल लॅब टेस्टचा पर्याय म्हणून पाहू नये.

कोरोनासंबंधित अ‍ॅप्स तयार करण्यात आले आहेत. यात काही अ‍ॅप लक्षण दाखवत असल्याचा दावा करत आहे. तर काही अ‍ॅप्स कोरोना रुग्णांना ट्रॅक करतात. सरकार आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशनकडून याच कोविड – 19 संबंधित अ‍ॅप लॉन्च केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like