‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर पाच महिन्यासाठी विकसित होते रोग प्रतिकारशक्ती : स्टडी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेतील भारतीय वंशाच्या संशोधकाने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की एकदा कोरोना विषाणूची लागण झाल्यावर शरीरात कमीत कमी पाच महिन्यासाठी कोविड-19 साठी प्रतिकारशक्ती निर्माण होते. अ‍ॅरिझोना विद्यापीठातील संशोधकांनी कोरोना विषाणूची लागण झालेल्या सुमारे सहा हजार लोकांच्या नमुन्यांमधील अँटीबॉडीजचा अभ्यास केला. विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक दीप्ता भट्टाचार्य यांनी सांगितले की संसर्गानंतरही पाच ते सात महिन्यांनतर उच्च प्रतीची अँटीबॉडी तयार होत असल्याचे आम्ही स्पष्टपणे पाहिले.

संसर्ग झाल्यानंतर 14 दिवसांपर्यंत रक्त तपासणीत या अँटीबॉडीज आढळतात

संशोधकांनी म्हटले की जेव्हा विषाणू प्रथम पेशींना संक्रमित करतो तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती विषाणूशी लढाई करण्यासाठी अल्पायुषी प्लाझ्मा सेल तैनात करते ज्यामुळे अँटीबॉडी तयार होतात. ते म्हणाले की या अँटीबॉडीज संसर्गानंतर 14 दिवसांपर्यंत रक्त तपासणीत आढळतात. संशोधकांनी असे म्हटले आहे की रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रतिक्रियेच्या दुसर्‍या टप्प्यात दीर्घकाळ जिवंत राहणाऱ्या प्लाझ्मा पेशी तयार होतात ज्या उच्च-गुणवत्तेच्या अँटीबॉडीज तयार करतात ज्यामुळे दीर्घकालीन प्रतिकारशक्ती टिकून राहते.

कोरोना संक्रमित लोकांमध्ये अँटीबॉडीच्या पातळीचा केला अभ्यास

भट्टाचार्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कित्येक महिन्यांपासून कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये अँटीबॉडीच्या पातळीवर अभ्यास केला. पाच ते सात महिन्यांपर्यंत रक्त चाचण्यांमध्ये संशोधकांना मुबलक कोरोना व्हायरस अँटीबॉडी आढळल्या. त्यांचा विश्वास आहे की प्रतिकारशक्ती यामुळे अधिक काळ टिकू शकेल.