आम्हालाही आरक्षण द्या …! ब्राह्मण महासंघाची मागणी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मराठा समाजाच्या आरक्षणानंतर आता ब्राम्हण समाजाने देखील आरक्षणाची मागणी केली आहे. पुण्यात ब्राह्मण महासंघाने देखील आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण करून मराठा समाजाला आरक्षण दिले त्याच  प्रमाणे ब्राम्हण समाजाचे देखील सर्वेक्षण करून ब्राम्हण समाजाला आरक्षण द्यावे. या सर्वेक्षण अहवालानंतर आम्ही आमच्या मागण्या सरकारकडे करू असे यावेळी सांगण्यात आले .
हा तर पुरेपूर अन्याय

मराठा समाजानंतर  इतर सामाज देखील आरक्षण मागत आहेत.आता खुल्या वर्गात २५ टक्के आरक्षण राहिले आहे .आता बाकी समाजाने या आरक्षणात आरक्षण मागू नये हा पुरेपूर अन्याय आहे असे देखील यावेळी ब्राह्मण महासंघाच्या सदस्यांकडून  सांगण्यात आले.

तथाकथित ब्राम्हण समाज म्हणजे पौरोहित्य करणारा वर्ग अशी मान्यता पूर्वीपासून होती पण आता खरोखरच पौरोहित्य करणारे किती टक्के आहेत? आता समाजात पौरोहित्य करणारा वर्ग असा किती उरला आहे ? त्यामुळे आता मागासवर्ग आयोगाने ब्राह्मण समाजाचे सर्वेक्षण करावे त्यांच्या अहवालानंतर आम्ही ब्राह्मण समाजाच्या मागण्या शासनाकडे मांडू असे यावेळी सांगण्यात आले.

तसेच  ब्राह्मण समाजाच्या स्थितीचे सर्वेक्षण करुन समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्या, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. त्यामुळे गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ब्राह्मण आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. ब्राह्मण समाजाला जातीच्या आधारे नव्हे तर आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण द्यावे, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे.

मराठा समाजाच्या १६ टक्के आरक्षणाच्या विधेयकाला विधीमंडळात मंजुरी मिळाली असून राज्यपालांचीही त्यावर स्वाक्षरी झाली आहे. त्यानंतर मुस्लीम आणि धनगर आरक्षणासह ब्राह्मण समाजाकडूनही आरक्षणाची मागणी होत आहे.