खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळणार का ? मोदी सरकारने दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक प्रकारच्या आरक्षणाच्या मागण्यांचा जोर वाढल्याचे चित्र पहायला मिळाले होते. त्यामध्ये अनेकदा खाजगी क्षेत्रात देखील आरक्षण लागू करण्यात यावे अशी मागणी देखील होत होती. मात्र औद्योगिक आणि देशांतर्गत व्यापार वृद्धी विभागाने खाजगी नोकऱ्यांमधल्या आरक्षणावर लोकसभेत स्पष्टीकरण दिलं आहे. खाजगी क्षेत्रात आरक्षण देण्याचा सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही, असं या मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं. त्यामुळे खाजगी क्षेत्रांतल्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.

मराठा समाजाला आरक्षण
राज्यात देखील भाजप सरकार येताच मराठा समाजाने आरक्षणासाठी मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्यात आले होते. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून आरक्षण लागू आहे.

सवर्णांसाठी देखील आरक्षण
सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण कमी झाल्याने खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्येही आरक्षण मिळावं, अशी मागणी अनेक वर्षं होते आहे. पण आता मोदी सरकारने लोकसभेतच याबद्दल स्पष्टीकरण दिल्याने खाजगी आरक्षणाबाबत चित्र स्पष्ट झाले आहे. सरकारने मागासलेल्या सवर्णांसाठी देखील 10 % आरक्षणाची घोषणा केली आणि पुन्हा एकदा खाजगी आरक्षणाबाबतचा मुद्दा समोर आला होता.

Visit : Policenama.com