Reservation in Promotion | अजित पवारांनी गाढवांचा नांगर फिरवला, गोपीचंद पडळकर यांचा घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पदोन्नतीमधील आरक्षण (Reservation in Promotion) रद्द करण्याच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी सरकारमधील (MVA Government) असलेले मतभेद समोर आले आहेत. यासंदर्भात काँग्रेसच्या (Congress) मंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी (Varsha) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांनी (Congress ministers) पदोन्नतीमधील आरक्षण (Reservation in Promotion) रद्द करण्याचा आध्यादेश मागे घेण्याची मागणी केली. यानंतर काँग्रेस मंत्र्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत देखील बैठक झाली. याच मुद्यावरुन आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

राष्ट्रवादी काँग्रेस हाच जातीयवादी पक्ष (NCP racist party)
सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांना पालकमंत्रीपदावरुन हटविण्याची सध्या चर्चा सुरु आहे.
यावर धनगर समाजाचे (Dhangar Samaj) पालकमंत्री असलेले भरणे यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्षातील काही नेत्यांकडून मोहीम सुरु होत आहे, असा प्रश्न पडळकर यांना विचारला. यावर उत्तर देताना पडळकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हाच सर्वाच जातीयवादी पक्ष (Racist party) असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. 5 वर्षाच्या मुलाला झोपेतून उठवून विचारलं, तरी ते सांगेल, कोणता पक्ष जातीयवादी आहे, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.

अजित पवारांनी गाढवांचा नांगर फिरवला
पदोन्नतीमधील आरक्षणाच्या (Reservation in Promotion) बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) भूमिका स्पष्टपणे पुढे आली.
पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय (Backward class in promotion) आहेत,
भटक्या विमुक्त जाती-जमाती आहेत, एससी-एसटी (SC-ST) आहेत,
याशिवाय विशेष मागास प्रवर्गही (Backward class) आहे.
या सर्वांच्या बाबतीत ज्या समितीचे अध्यक्ष अजित पवार (Committee Chairman Ajit Pawar) आहेत.
त्यांनी, या सर्व अधिकाऱ्यांच्या करिअरवर (Career of officers) गाढवांचा नांगर फिरवण्याचं काम केलं आहे, हे स्पष्टपणे दिसत असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Reservation in Promotion it was ajit pawar who turned plow donkey gopichand padalkar pramoting reservation

हे देखील वाचा

double murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या आई अन् मुलाचा खून, महिलेचा मृतदेह सासवड रोडवर तर मुलाचा कात्रज परिसरात आढळल्याने प्रचंड खळबळ

किडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी ‘ही’ खबरदारी घ्यावी, जाणून घ्या