Remdesivir Shortage : रेमडेसिवीरबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढला ‘हा’ महत्वाचा आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी महत्त्वाचे असलेले औषध रेमडेसिवीर इंजेक्शनला मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी महत्त्वाचा आदेश दिला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार येथून पुढे उपलब्ध साठ्यापैकी 10 टक्के कोटा हा फ्रंटलाइन वर्कर्ससाठी राखीव ठेवला जाणार आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्ध साठ्यापैकी दहा टक्के कोटा हा फ्रंटलाइन वर्कर्ससाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांसह विविध कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राखीव कोट्यातून इंजेक्शन उपलब्ध होणार आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा दहा टक्के कोटा हा फ्रंटलाइन वर्कर्ससाठी राखीव ठेवण्याच्या सूचना अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी या संदर्भातील आदेश दिले आहेत. फ्रंटलाइन वर्कर्समध्ये आरोग्य सेवा, महापालिका, नगरपालिका, पोलीस, महसूल, ग्रामविकास, नगरविकास, अन्न व औषध प्रशासन, परिवहन आदी विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. यांच्यासाठी दहा टक्के कोटा राखीव ठेवला जाणार आहे. यांना प्राधान्याने रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात यावे, असा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. मंगळवारी (दि.27) जिल्ह्यातील 456 रुग्णांना 7600 इंजेक्शनचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.