बंद होणार ‘हे’ पेमेंट वॉलेट, लवकर काढून घ्या पैसे अन्यथा होईल मोठं नुकसान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय रिझर्व बँकेनं वोडाफोन m – Pesa चं लायसन्स कॅन्सल केलं आहे. आरबीआयनं कारवाई केल्यानंतर आता एम पेसा हा व्यवसाय सुरू ठेवू शकणार नाही. m – Pesa कडे आता प्रीपडे इंस्ट्रुमेंटनं पेमेंट करण्याची सुविधा ठेवण्याचा अधिकार नसेल. आरबीआयनं मंगळवारी याबाबत माहिती दिली आहे.

3 वर्षांच्या आत करू शकतील क्लेम सेटलमेंट
m – Pesa चे कस्टमर्स आणि मर्चंट्स POS अंतर्गत व्हॅलिड क्लेम करू शकतात. लायसन्स रद्द झाल्यानंतर 3 वर्षांच्या आत कंपनीकडे आपले क्लेम सेटलमेंट करण्याचा अधिकार असणार आहे. वोडफोन म्हणणं आहे की, ही सुविधा बंद करण्यासाठी त्यांनी स्वत:च आरबीआयकडे अर्ज केला होता.

RBI नं 11 पेमेंट बँकांना दिलं होतं लायसन्स
गेल्याच वर्षी वोडफोन आयडिया अ‍ॅपनं निर्णय घेतला होता की, ते एम पेसा व्यवसाय बंद करणार आहे. त्यापूर्वीच आदित्य बिर्ला यांनी आयडिया पेमेंट्स बंद केलं होतं. ही पेमेंट बँक बंद झाल्यानंतर वोडाफोन आणि आयडिया यांचं विलनीकरण झालं होतं. आरबीआयनं 2015 साली जवळपास 11 पेमेंट बँकांना लायसन्स जारी केलं होतं. वोडफोन m-Pesa त्यापैकीच एक आहे.

फेसबुक पेज लाईक करा –