RBI नं अकाऊंट उघडण्याच्या नियमांमध्ये केला मोठा ‘बदल’, जाणून घ्या कोणत्या ग्राहकांना होईल फायदा !
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने चालू खात्यातील अनेक नियमांमध्ये दिलासा देण्याचे जाहीर केले आहे. आजपासून नवीन नियम अंमलात आले आहेत. नव्या नियमांनुसार 6 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेने कमर्शियल बँक आणि पेमेंट बँकांसाठी परिपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये चालू खात्याविषयी काही आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु आता या नियमांमुळे अनेक खात्यांना दिलासा मिळाला आहे. 6 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक जारी केले होते, ज्यात असे सांगितले गेले होते की आरबीआयने अशा अनेक ग्राहकांना चालू खाती उघडण्यास बंदी घातली आहे, ज्या ग्राहकांनी बँकिंग सिस्टममधून कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्टच्या रूपात क्रेडिट सुविधा घेतली आहे.
नवीन परिपत्रकात काय बदल झाले
याव्यतिरिक्त नवीन परिपत्रकानुसार, ग्राहकांना त्याच बँकेत त्यांचे चालू खाते (Current Account) किंवा ओव्हरड्राफ्ट खाते उघडावे लागेल, ज्या बँकेतून ते कर्ज घेत आहेत.
हा नियम का जारी केला गेला?
ज्या ग्राहकांनी बँकेकडून 50 कोटींपेक्षा जास्त कर्ज घेतले आहे अशा ग्राहकांना हा नियम लागू होईल. रिझर्व्ह बँकेने असे म्हटले आहे की ग्राहक अनेकदा कोणत्या तरी एका बँकेतून कर्ज (Loan) घेतात आणि दुसर्या बँकेत जाऊन करंट खाते उघडतात असे अनेकदा पाहिले गेले आहे. असे केल्याने कंपनीच्या कॅशफ्लोचा मागोवा घेण्यात बरीच अडचण येते. म्हणूनच आरबीआयने एक परिपत्रक जारी केले आहे की कोणत्याही बँकेने अशा ग्राहकांचे चालू खाते उघडू नये, ज्यांनी कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा लाभ दुसरीकडून घेतला असेल.
बँकांनीही या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत
अधिक माहिती म्हणजे आरबीआय (RBI) ने चालू खाते उघडण्याच्या अटींमध्ये सवलत देण्याबरोबरच ग्राहकांना सतर्क देखील केले आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की ही सूट केवळ अटींसह दिली जात आहे, त्यामुळे बँकांनाही याची काळजी घ्यावी लागेल. या व्यतिरिक्त बँकाही हे आश्वासन देतील की काही विशिष्ट व्यवहारासाठीच याचा वापर केला जाईल. याखेरीज बँकेकडून याकडे लक्ष ठेवले जाईल. आरबीआयने बँकांना नियमितपणे कॅश क्रेडिट/ ओव्हरड्राफ्टवर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.