उद्यापासुन (दि. १ जुलै) ‘बेसिक’ बँक खातेदारांना ‘या’ ६ सुविधा एकदम ‘फ्री’

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – भारतीय रिर्झव्ह बँकेने (आरबीआय) मुळ खातेदारांना मोठ गिफ्ट दिलं आहे. आरबीआयच्या नियमानुसार बँकांना दि. १ जुलैपासुन बँक खातेदारांना चेकबुक सहित इतर सुविधा मोफत द्याव्या लागणार आहेत. एवढेच नव्हे तर आरबीआयच्या नियमानुसार बँक खातेदारांना त्यांच्या खात्यावर किती रक्‍कम ठेवावी हे देखील बँक सांगु शकणार नाही.

दि. १ जुलैपासुन या ६ सुविधा मिळणार मुळ बँक खातेदारांना

१) कॅश डिपॉझिट :-  आरबीआयच्या नियमानुसार मुळ बँक खातेदार बँकेच्या शाखेत रक्‍कम जमा करू शकतो तसेच एटीएम आणि कॅश डिपॉझिट मशिनवर देखील रक्‍कम जमा करू शकतो. त्यावर बँकेकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

२) केंद्र व राज्य शासनाकडून जमा होणारी रक्‍कम :-  केंद्र आणि राज्य शासनाकडून खातेदारांच्या खात्यावर चेकव्दारे जमा होणार्‍या रक्‍कमेवर कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

३) रक्‍कम जमा करण्याची मर्यादा :- आरबीआयच्या नियमानुसार, बँक खातेदार महिन्यातुन कितीही वेळा खात्यावर रक्‍कम जमा करू शकतो तसेच खात्यावर कितीही रक्‍कम जमा करता येणार आहे.

४) एटीएमचा ४ वेळा उपयोग :- बँक खातेदार महिन्यातुन ४ वेळा विनामुल्य एटीएम मधून रक्‍कम काढू शकणार आहे.

५) एटीएम कार्ड :- आरबीआयच्या नियमानुसार बॅकांना सर्व मुळ बँक खातेदारांना एटीएम कार्ड आणि एटीएम कम डेबिट कार्ड द्यावे लागणार आहे.

६) चेकबुक :- सर्व मुळ खातेदारांना बँक चेक बुक देवू शकते. चेक बुकसाठी शुल्क आकारण्यात येवु नये असे आरबीआयने सांगितले आहे. चेकबुकसाठी खात्यावर कमीत कमी किती रक्‍कम असावी हे देखील बँक संबंधित खातेदारास सांगु शकणार नाही.

‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

पावसाळ्यात करू नका फिटनेसकडे दुर्लद्व ; करा ‘हे’ उपाय

पुण्यातील ७२ वर्षांच्या आजीने किडनी दान करून वाचवले ‘त्याचे’ प्राण