Reserve Bank of India | सर्वसामान्यांना झटका? PPF नंतर आता ‘त्या’ गुंतवणुकीवरही सरकारची नजर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Reserve Bank of India | वेगवेगळ्या असणाऱ्या कमी बचत योजनांचे (SSI) व्याजदर 2022-2023 या आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीमध्ये 9 ते 118 आधार अकांनी कमी करण्याची आवश्यकता असल्याचं भारताची सर्वात मोठी असणारी बँक म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) सांगितले आहे.

 

कमी बचत योजनांवरील व्याजदर हे वित्तीय व्यवस्थेतील कलानुसार कमी होत असले तरी, बँकांतील ठेवींच्या तुलनेत त्यांचा व्याजदर अद्याप अधिकच आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत व्याजदर 40 आधार अंकांनी कमी झाला आहे. पीपीएफ (PPF) सारख्या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीवरील व्याजदर गेल्या पाच वर्षामध्ये 1.5 टक्क्यांनी कमी झाले आहेत. असं RBI ने जारी केलेल्या ‘स्टेट ऑफ इकॉनॉमी’ (State Of Economy) अहवालात म्हटले आहे. (Reserve Bank of India)

 

दरम्यान, 31 मार्च 2022 रोजी सरकार कमी बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेणार आहे.
या पार्श्वभूमीवर RBI च्या या सूचनेला विशेष महत्त्व आहे, असं सुत्राकडून सांगण्यात आलं आहे.
तसेच, अल्प बचत योजनांचे व्याजदर भारत सरकारकडून निश्चित केले जातात.
त्यात PPF, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आणि पोस्टातील ठेवी यांचा समावेश आहे.
पोस्टातील ठेवींचा व्याजदर 5.5 ते 6.7 टक्के यादरम्यान आहे.
बँकांतील ठेवींच्या तुलनेत हे व्याजदर खूपच जादा असल्यामुळे त्यात कपात होणे आवश्यक असल्याचं RBI ने म्हटलं आहे.

 

 

Web Title :- Reserve Bank Of India | interest rates on savings schemes need to be reduced suggestion by rbi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | बांधकाम व्यावसायिकासह 37 जणांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

 

Kiara Advani Viral Photo | हॉटेल मधून बाहेर येताना स्पॉट झाली कियारा अडवाणी, पाहा व्हायरल फोटो

 

Adinath Cooperative Sugar Factory | शेतकऱ्यांचा रोहित पवारांना धक्का? ‘तो’ कारखाना बारामती ॲग्रोला देण्याचा ठराव रद्द!