रिझर्व्ह बँक पुन्हा कमी करू शकते व्याजदर, 0.25 टक्के होऊ शकते ‘कपात’

नवी दिल्ली : कोरोना संकटाला तोंड देत असलेल्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक व्याजदरात पुन्हा एकदा कपात करू शकते. माहितीनुसार, पुढील आर्थिक धोरण समिक्षेत आरबीआय प्रमुख धोरणात्मक दर रेपोमध्ये 0.25 टक्केची आणखी कपात करू शकते.

आरबीआय गव्हर्नर यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक धोरण समिती (एमपीसी) ची चार दिवस चालगणारी बैठक चार ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि सहा ऑगस्टला याबाबत अनेक घोषणा केल्या जातील.

कोविड-19 महामारीच्या प्रकोपामुळे अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान आणि लॉकडाऊनचा परिणाम रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक सतत पावले उचलत आहे. यापूर्वी एमपीसीच्या बैठका मार्च आणि मे मध्ये झाल्या आहेत. ज्यामध्ये धोरणात्मक रेपो दरात एकुण 1.15 टक्के कपात केली गेली.

वाढली आहे किरकोळ महागाई
खाद्य वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. विशेषता मांस, मच्छी, धान्य आणि डाळीमुळे ग्राहक मुल्य निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई जूनमध्ये वाढून 6.09 झाली आहे. रिझर्व्ह बँकेने स्वताच म्हटले आहे की, महागाईचा सुविधाजनक स्तर 4 टक्के (यामध्ये 2 टक्के प्लस किंवा मायनस होऊ शकते) आहे. म्हणजे आता महागाई रिझर्व्ह बँकेच्या सुविधाजनक कक्षेच्या बाहेर गेली आहे.

अजून आहे आशा
न्यूज एजन्सी पीटीआच्यानुसार इक्राच्या प्रिंसिपल इकोनॉमिस्ट अदिती नायर यांनी म्हटले की, आपण रेपो दरात 0.25 टक्के आणि रिव्हर्स रेपो दरात 0.35 टक्के कपातीची अपेक्षा करत आहोत.

नायर यांनी म्हटले, मात्र किरकोळ महागाई एमपीसीचे लक्ष्य असलेल्या दोन-सहा टक्केच्या पुढे गेली आहे. परंतु, ती ऑगस्ट 2020 पर्यंत पुन्हा या सीमेच्या आत येण्याची आशा आहे.

अशाप्रकारची अपेक्षा व्यक्त करत युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राजकिरण राय यांनी म्हटले, 0.25 टक्के कपातीची शक्यता आहे किंवा दर यथावकाश ठेवू शकतात.