कामाची गोष्ट ! RBI नं बदलले बँकेच्या ATM कार्डमधून पैसे काढण्याचे नियम, ‘या’ तारखेपासून लागू होणार ‘रूल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI ने एटीएम कार्ड म्हणजेच डेबिट आणि क्रेडिट कार्डसंबंधित नवे नियम जारी केले आहेत. आरबीआयकडून बँकांना सांगण्यात आले की भारतातील सर्व कार्ड जारी करताना एटीएम आणि पीओएसवर फक्त डोमेस्टिक कार्ड वापरण्याची परवानगी द्यावी. RBI कडून सांगण्यात आले की, आंतरराष्ट्रीय देवाण – घेवाणीसाठी मंजुरी घ्यावी लागेल. याशिवाय ऑनलाइन व्यवहार, कार्ड नसताना होणारे व्यवहार आणि काटेक्टलेस व्यवहारासाठी ग्राहकांना आपल्या कार्डवर या सेवांना वेगळे सेट करावे लागतील. हा नियम 16 मार्च 2016 पासून येणाऱ्या नव्या कार्डवर लागू होईल. जुने कार्डधारक हे निश्चित करु शकतात की, यातील कोणत्या सुविधेला त्यांना कधी बंद करायचे आहे आणि कधी सुरु करायचे आहेत.

आरबीआयचे नावे डेबिट आणि क्रेडिट कार्डचे नियम –
1.
आरबीआयने बँकांना सांगितले आहे की, डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करताना आता ग्राहकांना डोमेस्टिक ट्रांजेक्शनला परवानगी दिली गेली पाहिजे. म्हणजे हे स्पष्ट आहे की जर आवश्यकता नसेल तर एटीएम मशीनमधून पैसे काढताना आणि पीओएस ट्रमिनलवर शॉपिंग करताना परदेशी ट्रांजेक्शनला परवानगी देऊ नये.

2. आंतरराष्ट्रीय व्यवहार, ऑनलाइन व्यवहार आणि कॉन्टेक्टकलेस कार्ड व्यवहारासाठी, ग्राहकांना यासाठी वेगळ्या प्रकारे आपली प्राथमिकता सांगावी लागेल. म्हणजेच हे स्पष्ट आहे की ग्राहकांना आवश्यकता असेल तर ही सेवा मिळणार, यासाठी ग्राहकांना अर्ज देखील करावा लागेल.

3. सध्याच्या कार्डसाठी जारीकर्ता आपल्या जोखिमीआधारे निर्णय घेऊ शकतात. म्हणजेच तुम्ही तुमच्या कार्डला डोमेस्टिक ट्रांजेक्शन वापरु इच्छितात किंवा इंटरनॅशनल ट्रांजेक्शन वापरु शकतात याचा निर्णय देखील ग्राहकांनेच घ्यायचा आहे. तसेच कोणती सेवा सुरु करायची कोणती बंद याचा निर्णय देखील ग्राहकच घेईल.

4. ग्राहक 24 तास सात दिवस आपल्या ट्रांजेक्शन मर्यादेला कधीही बदलू शकतात. सोप्या शब्दात सांगायचे तर आता तुम्ही तुमच्या एटीएम कार्डला मोबाइल अ‍ॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशीनवर जाऊन आयवीआरद्वारे कधीही तुमची ट्रांजेक्शन मर्यादा निश्चित करु शकतात.

5. आरबीआयचे हे एटीएम कार्ड संबंधित नवे नियम 16 मार्च 2020 पासून लागू होईल.

6. आरबीआयचे हे नवे नियम प्रीपेड गिफ्ट कार्डवर लागू होणार नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/