Reserve Bank of India | तुमचे कर्ज महागणार की स्वस्त होणार? आरबीआयची मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Reserve Bank of India | रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर आरबीआयचे (Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तिकांत दास (Governor Shaktikanta Das) यांनी माहिती देताना रेपो दरात (Repo Rate) कोणतेही बदल केले नसल्याचे सांगितले. त्यामुळे कर्जदारांना तुर्तास दिलासा मिळणार असून त्यांचा EMI देखील वाढणार नाही. पहिल्यापासून अधिक व्याजदराचा (Interest Rate) सामना करणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.
तीन दिवसीय एमपीएस (MPS) बैठकीचे निकाल जाहीर करताना आरबीआयचे (Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दर स्थिर ठेवण्याची घोषणा केली आहे. म्हणजे सध्या आरबीआयचा रेपो रेट 6.50 टक्के आहे. याआधी त्यात 25 बेसिस पॉईंट्सने वाढ केली जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु बैठकीत रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मे 2022 पासून रेपो रेट सलग 6 वेळा वाढवण्यात आला आहे.
Post Monetary Policy Press Conference by Shri Shaktikanta Das, RBI Governor- April 06, 2023 https://t.co/6PkXMRhmic
— ReserveBankOfIndia (@RBI) April 6, 2023
जीडीपीमध्ये 7 टक्क्यांनी वाढ
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जगात सध्या सुरु असलेल्या बँकिंग संकटावर चिंता व्यक्त केली. जागतिक अर्थव्यवस्था (Economy) अशांततेच्या एका नव्या युगाला तोंड देत आहे. 2022-23 मध्ये जीडीपीमध्ये (GDP) 7 टक्क्यंची वाढ झाली आहे. तसेच एप्रिल-जून 2023 मध्ये जीडीपी दर 7.8 टक्के आणि जुलै-सप्टेंबर 2023 मध्ये 6.2 टक्के असा अंदाज आहे. तसेच ऑक्टोबर-डिसेंबर 2023 जीडीपी दर 6 टक्क्यांवरुन 6.1 टक्के आणि जानेवारी-मार्च 2024 जीडीपी दर अंदाज 5.8 टक्क्यांवरुन 5.9 टक्के करण्यात आल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज दरात वाढ होणे.
तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.
म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दर ही वाढवावे लागतात.
तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
Web Title :- Reserve Bank of India | rbi keeps the repo rate unchanged at 6 5 pecent
announces rbi governor shaktikanta das no change in emi
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | चंदननगर ! बापाने केले 15 वर्षाच्या मुलीला गर्भवती; 42 वर्षाच्या नराधमाला अटक
Pune Crime News | मुंढवा : भांडणे सोडविण्यास जाणे पडले महागात; तरुणाला मारहाण करुन केले जबर जखमी