RBI चा NPR बद्दल मोठा निर्णय ! आता बँकांमध्ये ‘या’ कामांसाठी केला जावु शकतो वापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार नंतर आता आरबीआय (Reserve Bank of India) ने एनपीआर म्हणजेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (NPR) बाबत मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने याची बँकेत केवायसीचे अधिकृत वैध कागदपत्र म्हणून नोंदणी केली आहे. म्हणजेच एनपीआर लेटर आता आरबीआयचे ऑफिशिअल व्हॅलिड डाक्युमेंट्स (OVDs-Officially Valid Documents) बनले आहे. येत्या काही दिवसांमध्ये, खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये याचा समावेश होऊ शकणार आहे.

ऑफिशिअल व्हॅलिड डाक्युमेंट्स (OVDs-Officially Valid Documents) मध्ये पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र, नरेगाने जारी केलेले जॉब कार्ड आणि आता राज्य सरकारने जारी केलेले एनपीआर लेटर (ज्यामध्ये नाव-पत्ता लिहिला आहे) यांचा समावेश करण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी सरकारने मागील वर्षात म्हणजेच २०१९ मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) ला मान्यता दिली. ज्या अंतर्गत भारतीय नागरिकांची बायोमेट्रिक व वंशावळी नोंदविण्यात येतील. आसाम व्यतिरिक्त राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत १ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत ही जनगणना देशभरात घरोघरी जाऊन करण्यात येणार आहे.

काय असते केवायसी (KYC) –

केवायसी (Know Your Customer) ला सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ही ग्राहकाबद्दल संपूर्ण माहितीची प्रक्रिया आहे. प्रत्येकासाठी केवायसी करणे हे खूप महत्वाचे आहे. एक प्रकारे KYC बँक आणि ग्राहक यांच्यातील संबंध मजबूत करत असते.

केवायसी शिवाय बँक खाते उघडणे सोपे नाही. कोणीही बँकिंग सेवांचा गैरवापर करत आहे का, याची खात्री केवायसीमार्फतच केली जाते. केवायसी फॉर्म ऑनलाईन देखील भरले जातात पण कागदपत्रे आणि फोटो पडताळणीसाठी एकदा बँकेला भेट देणे आवश्यक असते.

एनपीआर म्हणजे काय –

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) ही देशातील सामान्य रहिवाशांची नोंद ठेवणारे रजिस्टर आहे. ते नागरिकत्व कायदा १९५५ आणि नागरिकत्व (नागरिकांची नोंदणी आणि राष्ट्रीय ओळखपत्र) कायदा २००३ च्या तरतुदींनुसार स्थानिक (गाव/उपशहर), उपजिल्हा, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तयार केले गेले आहे. भारतातील सर्व रहिवासींना एनपीआरकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. कोणताही रहिवासी जो की ६ महिने किंवा त्याहून अधिक काळ एखाद्या स्थानिक क्षेत्रात रहात असेल त्याला एनपीआर मध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे.

एनपीआरचा उद्देश देशातील प्रत्येक सामान्य रहिवासीची एक व्यापक ओळख डेटाबेस तयार करणे आहे. डेटाबेसमध्ये डेमोग्राफिक बरोबरच बायोमेट्रिक तपशिलाचा समावेश असतो.

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीमध्ये या बाबींची माहिती द्यावी लागेल :

– व्यक्तीचे नाव
– घरातील कुटुंबप्रमुखांशी नाते
– वडिलांचे नाव
– आईचे नाव
– पतीचे नाव (विवाहित असल्यास)
– लिंग
– जन्म तारीख
– वैवाहिक स्थिती
– जन्मस्थान
– राष्ट्रीयत्व (घोषित केल्याप्रमाणे)
– सामान्य निवासस्थानाचा सध्याचा पत्ता
– सध्याच्या पत्त्यावर राहण्याचा कालावधी
– स्थानिक निवासी पत्ता
– व्यवसाय
– शैक्षणिक पात्रता

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like