Reserve Bank of India (RBI) | रिझर्व बँकेने आणखी महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना केला रद्द

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – बँक खाते धारकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. भारतातील केंद्रीय बँक रिझर्व बँक ऑफ इंडियाने Reserve Bank of India (RBI) रुपी बँक (RUPI Bank) पाठोपाठ आणखी एका बँकाचा परवाना रद्द केला आहे. ही बँक महाराष्ट्रातील असून याचा परवाना रद्द केल्याची माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाने Reserve Bank of India (RBI) दिली आहे.

‘बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेड’, यवतमाळ (Babaji Date Mahila Shahakari Bank Ltd, Yavatmal) या बँकेचा परवाना रद्द केला गेला आहे. या बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नाही, त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती शुक्रवारी रिझव्‍‌र्ह बँकेने दिली. प्रात्प आकडेवारीनुसार या बँकेतील 79% खातेधारकांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम ठेव विमा आणि क्रेडीट गॅरंटी कार्पोरेशनकडून (DICGC) परत मिळण्याचा अधिकार आहे. 16 ऑक्टोबर 2022 पर्यंत एकूण विमाच्या रकमेपैकी 294.64 कोटी रुपये बँकेने जमा केले आहेत. त्यामुळे ते खातेधारकांना वाटता येणार आहेत.

त्यामुळे आता ‘बाबाजी दाते महिला सहकारी बँक बँकीगचा व्यवसाय करणार नाही.
त्याचसोबत बँकेचे ठेवी स्वीकारणे आणि देयके देणे आदी व्यवहार देखील थांबविण्यात आले आहेत.
त्यामुळे आता ही बँक कोणताही व्यवहार करु शकणार नाही. त्याचा या बँकेतील खातेधारकांना मोठा फटका बसला आहे.

Web Title :- Reserve Bank of India (RBI) | rbi has canceled the license of babaji date mahila sahakari bank limited bank in maharashtra there will be a big impact  on the customers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता’

Chandrakant Patil | ‘एखादा चित्रपट तुम्हाला आवडला नाही तर चित्रपटगृहाबाहेर गळ्यात पाट्या लावून उभे राहा’ – चंद्रकांत पाटील

Aam Aadmi Party | ठाणे मनपा निवडणूकीत ‘आप’ची एन्ट्री, सत्ताधारी आणि विरोधकांची वाढली डोकेदुखी